Mumbai police sex scandal : मुंबई मोटर वाहन विभागात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उपायुक्त आणि दोन पोलिस निरीक्षकांनी बलात्कार केल्याचा आरोप ८ महिला पोलिस शिपायांनी केल्याने खळबळ उडाली आहे. या महिलांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. हे पत्र, मुख्यमंत्री आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आले असून हे पत्र सोशल मिडियात व्हायरल झाले आहे.
मुंबई मोटार वाहन विभागात या महिला कार्यरत आहेत. त्यांनी बलात्काराचा आरोप केल्यावर त्याची बदली करण्यात आल्याचे देखील पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या बाबत मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी बोलण्याचे टाळत आहेत. ज्यांची नावे पत्रात आहेत त्यांनी हे पत्र लिहिले नसल्याचा दावा काहींनी केला आहे. बदली आणि बढत्यांवरून जे गटतट पडलेत त्यातून हे आरोप करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
या आठ पोलिसांनी लिहिलेल्या पत्रात अनेक आरोप करण्यात आले आहे. आठही पीडित महिला नागपाडा मोटार परिवहन विभागात चालक आहेत. दोन पोलीस निरीक्षक आणि एका उपायुक्तांनी सरकारी वाहनातून त्यांना त्यांच्या रूमवर नेऊन वारंवार बलात्कार केला. त्यांच्यासह एक लेखनिक, उपायुक्तांचा ऑपरेटर, चालक, ऑर्डली यांनीही बलात्कार केल्याचा आरोप या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, गरोदर राहिल्यानंतर गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले असून प्रत्येकी सात हजार रुपये उपायुक्तांच्या आदेशावरून देऊन या प्रकरणाची व वाच्यता करू नये म्हणून धमकी देखील देण्यात आली. दोन्ही निरीक्षक आठवडय़ातून तीन दिवस जबरदस्तीने घरी घेऊन जात आमच्यावर अत्याचार कर्णयात आले. आमचे अश्लील व्हिडीओ देखील तयार कर्णयात आले असून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्वाविरोधात आम्ही एकत्र येऊन आवाज उठवल्यावर आमची बदली करण्यात आली. आम्ही शेतकरी कुटुंबातील असून आमचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई कारवाई अशी मागणी त्यांनी केली आहे.
या तिन्ही अधिकाऱ्यांचे मोबाईल जप्त करून त्याची तपासणी व्हावी, त्यांना बडतर्फ करून कठोर कारवाई करावी. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून आत्महत्या करू. यासाठी हे अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, या पत्राची दखल घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
संबंधित बातम्या