Thane Iron Shead Fell on Football Turf : ठाण्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ठाण्यात फुटबॉल मैदानावर एका इमारतीचा मोठा पत्रा कोसळल्याने मैदानावर खेळणारे पाच ते आठ मुले गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जखमी मुलांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. ठाण्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
ठाण्यातील गावंड बाग परिसरात हे फुटबॉल मैदान आहे. या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच वादळी वारा देखील भरपूर होता. यामुळे येथील एका इमारतीचा पत्रा उडून खाली असलेला फुटबॉल मैदानावर पडण्यामुळे मैदानावर खेळत असलेले सात ते आठ मुले जखमी झाले.
जोरदार पाऊस सुरू असतांना अचानक मोठा पत्रा मैदानावर कोसळल्याने खेळत असणारी मुले जखमी झाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे मैदानावर गोंधळ उडाला. मैदानावर असलेल्यांनी तातडीने जखमी मुलांना मैदानाच्या बाजूला घेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने ठाण्यातील बेथनी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींची प्रकृती ही गंभीर असल्याचं समजतयं. या घटनेमुळे येथे खेळणाऱ्यांवर भीतीचे सावट आहे.
या प्रकरणी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार फुटबॉल टर्फवर मुले खेळत होती. यात लहान आणि मोठ्या मुलांचा देखील समावेश होता. पाऊस सुरू झाल्यामुळे लहान मुलांना घरी पाठवण्यात आले. यानंतर येथे मोठी मुलं फुटबॉल खेळत होती. दरम्यान, पावसाचा जोर वाढला. तसेच वादळी वारा देखील सुरू झाला. या वाऱ्यामुळे शेजारी असलेल्या एका मोठ्या इमारतीवरील पत्र हा मैदानावर खेळत असणाऱ्या मुलांच्या अंगावर पाडला. यात आठ मुलांना गंभीर दुखापत झाली असून यातील दोघांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे. या फुटबॉल मैदानावर मुलांना प्रशिक्षण दिले जाते. कोच या ठिकाणी मुलांना ट्रेनिंग देतात. त्यामुळे इथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक मुले फुलबॉल खेळण्यासाठी येतात.
संबंधित बातम्या