Eid-e-Milad holiday : मुंबईत १६ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी नाही, काय आहे कारण?-eidemilad holiday in mumbai not on september 16 maharashtra govt reschedules ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eid-e-Milad holiday : मुंबईत १६ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी नाही, काय आहे कारण?

Eid-e-Milad holiday : मुंबईत १६ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी नाही, काय आहे कारण?

Sep 16, 2024 12:16 AM IST

गणपती उत्सवाचा शेवटचा दिवस १७ सप्टेंबर आहे, तर ईद-ए-मिलाद चंद्राच्या स्थितीच्या अधीन राहून १६ सप्टेंबर रोजी साजरी केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत ईद-ए-मिलादची सुट्टी बदलली
मुंबईत ईद-ए-मिलादची सुट्टी बदलली (HT File Photo)

महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मुंबईत ईद-ए-मिलादची अधिकृत सुट्टी १६ सप्टेंबर बदलून १८  सप्टेंबर केली आहे. १७ सप्टेंबर रोजी येणाऱ्या गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक मुस्लिम समाजाने १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबर रोजी ईदची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अन्य जिल्ह्यातील जिल्हाधिकारी परिस्थितीनुसार इतर जिल्ह्यांमध्ये ईदच्या सुट्टीचे वेळापत्रक बदलण्याबाबत निर्णय घेऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ईद-ए-मिलाद ला १६ सप्टेंबर ऐवजी १८ सप्टेंबरला सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबर रोजी येत असून दोन्ही सण धुमधडाक्यात साजरे करता यावेत यासाठी मुस्लिम समाजबांधवांनी  १८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे.

गणपती उत्सवाचा शेवटचा दिवस १७ सप्टेंबर ला आहे, तर ईद-ए-मिलाद चंद्राच्या स्थितीच्या अधीन राहून १६ सप्टेंबर रोजी साजरी केली जाण्याची शक्यता आहे.

ईदच्या मिरवणुकीचे वेळापत्रक सलग दुसऱ्या वर्षी बदलले -

मुस्लिम समाजाने जातीय सलोखा राखण्यासाठी मिरवणुकीचे वेळापत्रक बदलले आहे. "गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मुस्लिम समाजाने स्वेच्छेने आपल्या धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक बदलले आहे.  हे समाजातील ऐक्य आणि सहअस्तित्वाचे उल्लेखनीय प्रदर्शन आहे,'असे पोलिस उपायुक्त (परिमंडळ एक) पंकज डहाणे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे नवी मुंबईतील ईद-ए-मिलादची मिरवणूक तुर्भे येथून सुरू होऊन वाशी आणि कोपरखैरणे मार्गे घणसोली दर्ग्यावर संपते.

ईद-ए-मिलाद किंवा ईद-ए-मिलाद-उन-नबी हा दिवस इस्लामी धर्माची स्थापना करणारे पैगंबर  यांचा जन्म दिवस आहे. हा उत्सव पारंपारिकपणे १६ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो - चंद्राच्या स्थितीच्या अधीन राहून. या उत्सवादरम्यान जगभरातील मुस्लीम बांधव मिरवणूक काढत असतात.

 

Whats_app_banner
विभाग