मराठी बातम्या  /  धर्म  /  भारतीय संविधनाचं तंतोतंत पालन करूनच धर्मांध शक्तींचा पराभव शक्य: माजी न्यायाधीश अभय ठिपसे

भारतीय संविधनाचं तंतोतंत पालन करूनच धर्मांध शक्तींचा पराभव शक्य: माजी न्यायाधीश अभय ठिपसे

HT Marathi Desk HT Marathi
May 07, 2023 05:48 PM IST

भारतीय घटनेला सर्वोच्च मानणे हाच आपल्यापुढचा एकमेव योग्य मार्ग आहे. भारतीय घटनेमध्ये धार्मिक स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे. त्यामुळे घटनेतील तत्वे शब्दशः अंमलात आणणे गरजेचे आहे. (Eid Get together in Mumbai)

Justice (retired) Abhay Thipsay in Eid Get together in Mumbai
Justice (retired) Abhay Thipsay in Eid Get together in Mumbai

भारतीय संविधानाचं तंतोतंत पालन करूनच आपण देशात सांप्रदायीक शक्तींना हरवू शकतो, असं मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय ठिपसे यांनी व्यक्त केलं. ‘जमाते इस्लामी हिंद’ संस्थेतर्फे तर्फे मुंबईत नुकताच सर्वधर्मिय ईद मिलन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात सदगुरू सतनाम दास, पारशी धर्मगुरू डॉ, होमी ढल्ला, कामगार नेते विश्वास उटगी, डॉ. अनिल चतुर्वेदी, मुफ्ती अशफाक काजी, सामाजिक कार्यकर्ते संध्या म्हात्रे, लेखक इरफान इंजिनियर, ‘आप’ पक्षाचे मुंबई अध्यक्ष रुबेन मॅस्करहंस, तसेच जमाते इस्लामी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम इंजिनियर सहभागी झाले होते.

ट्रेंडिंग न्यूज

ठिपसे म्हणाले, ‘ब्रिटिश या देशात सर्वप्रथम आले तेव्हाचा भारत आणि ते देश सोडून गेले तेव्हाचा भारत एकच नव्हता. आज जर देशात कुठे रस्ते नाहीत असं आपण म्हणत असू तर मग पूर्वीचा काळ हा सुवर्णकाळ होता असं कसं म्हणता येईल.? आपण समानतेचे ध्येय ठेवले पाहिजे.

आज देशात राहणारे बहुसंख्य लोक हे अल्पसंख्याकांविरुद्ध मनात तक्रार बाळगून असतात. अल्पसंख्याक हेच त्यांच्या सर्व दुःखाचे कारण आहेत असा खोटी सबब घेऊन जगत असल्याचे दिसतात. देशात अल्पसंख्याकांचे लाड केले जात आहे, त्यांना अधिक सवलती दिल्या जात असल्याचं भ्रम बाळगून असतात. आणि मग या गोष्टीचे काहींकडून भांडवल केले जाते, ते आपण पाहतोय.’ असं ठिपसे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘मला न्यायव्यवस्थेत काम करण्याचा ३० वर्षांचा अनुभव आहे. मी काही चांगली, कायदेशीर आणि सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक अशी प्रकरणे हाताळलेली आहेत. न्यायव्यवस्थासुद्धा समता राखत नाही, असे मला वाटते. आताच्या परिस्थितीत घटना बदलण्याचीही गरज उरलेली नाही, असं एका घटना अभ्यासकाने एका लेखात लिहिल्याचे स्मरते. कारण न्यायिक व्याख्येत बदल करून संविधान बदलले जात आहे, असं या लेखताचं म्हणणं आहे. न्यायालयाचे असे अनेक निर्णय आहेत जे फारच असुरक्षित असे आहेत. अशा काही निर्णयांमध्ये स्वीकृत विचारांपासून विचलन केले गेल्याचं दिसतं. त्याकडे कुणाचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. मी बहुसंख्येत असल्याने या देशात माझाच वरचष्मा असायला हवा, हा विचार चुकीचा आणि फार गंभीर असल्याचे ठिपसे म्हणाले. याच गोष्टीचे काही जण राजकीय फाद्यासाठी भांडवल करून समाजात द्वेष पसरवतात. अशा परिस्थितीत भारतीय घटनेला सर्वोच्च मानणे हाच आपल्यापुढचा एकमेव योग्य मार्ग आहे. भारतीय घटनेमध्ये धार्मिक स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे. त्यामुळे घटनेतील तत्वे शब्दशः अंमलात आणणे गरजेचे आहे.

जमाते इस्लामीचे राष्ट्रीय अध्यक्ष सलिम इंजिनियर यांनी समारोपीय भाषण केले. भारत हा देश येथे राहणाऱ्या सर्वांचा आहे. देशाच्या उभारणीत प्रत्येकाला आपले योगदान द्यायचे आहे. प्रेम आणि एकतेने लोकांच्या मनातील द्वेष मिटवून त्याग आणि प्रेमाचा संदेश सार्वजनिक करणे गरजेचे असल्याचे इंजिनियर म्हणाले.

 

 

WhatsApp channel
विभाग