Pune Accident News : पुणे जिल्ह्यात अपघात सत्र सुरूच आहे. गुरुवारी एका भरधाव कंटेनरने १० ते १५ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतांना आता पुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जण ठार झाले आहे. एका भरधाव आयशर ट्रकने मॅक्स ऑटोला पाठीमागून धडक दिल्याने हा ऑटो चेंडू प्रमाणे हवेत उडाला. यातील ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे सकाळी १० वाजता झाला. या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले आहेत. एक प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो हा पुणे नाशिक मार्गाने जात होता. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने या ऑटोला जोराची धडक दिली. त्यामुळे हा ऑटो एखाद्या चेंडू प्रमाणे हवेत उडाला. हा ऑटो या मार्गावर ब्रेक फेल झालेल्या एसटीवर जाऊन आदळला. या घटनेत ४ महिला, ४ पुरुष व एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तिघे जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांची व जखमींची नावे समजू शकली नाही.
अपघात होताच महामार्गावर गोंधळ उडाला. या परिसरात ट्राफिक जाम झाले आहे, स्थानिक नागरिक व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जात अपघातातील जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या