Maharashtra Ssc Board Result 2024: राज्यात बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेत ९२.६० टक्के मुले आणि ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.५१ %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९१.९५ %) आहे. दरम्यान, हा निकाल लागल्यावर आता दहावीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न विचारला जात होता. या बाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महत्वाची अपडेट दिली आहे.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्रकारांनी १० वीचा निकाल कधी लागणार या बाबत प्रश्न विचारला होता. यावेळी केसरकर यांनी १२ वीत उत्तीर्ण झालेल्या मुलांचे अभिनंदन करत १० वीच्या निकालात अपडेट दिली आहे. दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो. अशी माहिती मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी दिली.
दीपक केसरकर म्हणाले, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत, ती मुले पुन्हा बसू शकतात. परीक्षा लवकर घेण्याची सूचना देखील देण्यात आल्या आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी कोणीही नाराज होऊ नयेत. संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. तसेच बारावीमध्ये कमी मार्क्स मिळाले आहेत, त्यांना देखील पुन्हा परीक्षे देता येणार आहे. साधारण जुलैमध्ये ही परीक्षा होईल, ऑगस्टमध्ये निकाल लागतील.
आरटीई घोटाळ्यावर केसरकर म्हणाले, याला घोटाळा म्हणता येणार नाही. कोणीही खोटी कागदपत्रे तयार करू नये. शाळा प्रवेश हे जिल्हा स्तरीय होतात. जिल्हास्तरावर गुन्हा नोंदवला गेला आहे. हे असले गैरप्रकार कसे रोखता येतील याबाबत उपाय योजना सुरू आहे.