पुणे : 'देशात शिक्षण, आरोग्य क्षेत्रात म्हणाव्या तशा सुविधा नाहीत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही परिस्थीती बिकट आहे. कोरोना काळात ही अवस्था प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत या सुविधा पुरविणे येत्या काळात गरजेचे आहे. या सोबतच समाजातील सामाजिक, आर्थिक अस्पृश्यता नष्ट होणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केले.
पुण्यातील डोणजे परिसरात एका दवाखान्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेते नाना पाटेकर, आमदार भिमराव अण्णा तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ग्रामीण भागात शिक्षक आहेत तर शाळेला इमारती नाहीत. इमारत आहे तर विद्यार्थी नाहीत. जर दोन्ही असेल तर शिक्षक नाही. आज ही परिस्थीती बदल आहे. मात्र, आरोग्य विषयक समस्या आजही आहेत. कोरोना काळात ते प्रकर्षाने जाणवले. जेव्हा कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता होती. तेव्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात आम्ही व्हेन्टीलेर, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर पाठवले. पण तेथील डॉक्टरांना ते कसे वापरावे हे माहित नव्हते. त्यांना ते कसे वापरावे याचे व्हिडीओ पाठवावे लागले, ही दुर्देवाची बाब आहे. ग्रामीण भागात उभारला हा दवाखाना येथील नागरिकांसाठी फायदद्याचा ठरणार आहे. कारण या ठिकाणी चांगले आणि स्वस्तात उपचार मिळणार आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या दिवशी हा दवाखाना सुरु होतोय ही चांगली बाब आहे. आज समाजातील जे ख-या अर्थाने शोषित आहे, वंचित आहेत, दलित आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या आर्थीक गरजा पूर्ण झाल्या की त्यातून जे गरजु आहे त्यांना मदत करणे गरजेचे आहे.
गडकरी म्हणाले, मी जात पात मानत नाही. मानवता वाद आणि साजाजिक दायित्व ही भावना आज सर्वात मोठी आहे. गरीब लोकांची सेवा या दवाखान्याच्या माध्यमातून आपण करणार असल्याने आनंद झाला आहे. आज समाजात जे ख-या अर्थाने शोषित आहे, पिडीत आहेत, दलीत आहेत. या सोबत सामाजिक आर्थीक शैक्षणिक दृष्टा मागासलेले आहेत. ज्यांच्याजवळ आजही वैद्यकीय सुविधा पोहचू शकत नाही अशांना चांगल्या सुविधा देणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महामानवाच्या जयंतीच्या दिवशी सजामातील जो जातीवाद, अष्पृष्यता आहे ती समुळ नष्ट व्हावी, सामाजिक आणि आर्थीक समानता ख-या अर्थाने प्रस्तापित झाली पाहिजे. आणि शोषित पिडीत मानसाला सन्मानाने जगता आले पाहिजे. हे तेव्हाच शक्य आहे. जेव्हा शिक्षण विषयक स्वास्थ्य विषयक आर्थिक विषयक सगळ्या सुविधा त्यांना मिळतील तेव्हाच ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार आहे. हे काम म्हणजे शॉर्टकट नाही. यासाठी खुप लाँग टर्म काम करावे लागणार आहे.
देशातील ११५ मागास जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा उभारणार
देशातील आर्थीकदृष्ट्या, आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत मागास असलेली ११५ जिल्ह्यात सरकारतर्फे सुविधांचा विकास केला जाणार आहे. या माध्यमातून तेथील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले.