मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संजय राऊतांना ईडीचे समन्स, शिवसेनेची अडचण वाढणार

संजय राऊतांना ईडीचे समन्स, शिवसेनेची अडचण वाढणार

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 27, 2022 12:53 PM IST

गेल्या चार दिवसांपासून परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यातच आता ईडीने संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) समन्स पाठवले आहेत. राज्यात एका बाजुला राजकीय गोंधळ सुरु असताना राऊतांना ईडीने उद्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. गेल्या चार दिवसांपासून परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यातच आता ईडीने संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलावले आहे.  (ED Summons To Sanjay Raut)

ईडीने समन्स पाठवल्याच्या वृत्तावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, "अद्याप ईडीचं समन्स मला मिळालेलं नाही. संध्याकाळपर्यंत कदाचित ते मिळेल. तसं समन्स आल्यास मी वेळ वाढवून मागेन. माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत."

पत्रा चाळ प्रकरणी प्रविण राऊत यांनी काही खुलासे केले आहेत. या प्रकरणी ईडीने उद्या संजय राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहेत. यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पक्षात बंडखोरी सुरू असताना या सगळ्या घडामोडीत ईडीच्या चौकशीत संजय राऊत अडकले तर शिवसेनेला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.

पत्राचाळमध्ये वाधवान बंधूंनी म्हाडाकडून मिळालेला एफएसआय इतर बिल्डर्सना विकला. त्याऐवजी पैसे घेतले आणि पुनर्विकासासाठी बँकांकडूनही कर्ज घेतलं. मात्र बिल्डिंग बांधली नाही आणि म्हाडासह बिल्डर्सनी वाधवान बंधूंविरोधात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात EOW ने चौकशी केली होती. यात संजय राऊत यांच्या पत्नीला काही पैसे दिल्याचीही तक्रार होती. याचीच चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊत यांना समन्स बजावले आहेत.

IPL_Entry_Point