ED Raid : राज्यात ईडीची मोठी कारवाई! जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोडमध्ये ३१५ कोटींची मालमत्ता जप्त
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ED Raid : राज्यात ईडीची मोठी कारवाई! जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोडमध्ये ३१५ कोटींची मालमत्ता जप्त

ED Raid : राज्यात ईडीची मोठी कारवाई! जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोडमध्ये ३१५ कोटींची मालमत्ता जप्त

Updated Oct 15, 2023 05:09 PM IST

ED Raids in mumbai thane jalgaon : ईडीने बँक फसवणूक प्रकरणी विविध ज्वेलर्सच्या संपत्तीवर छापेमारी करत तब्बल ३१५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. राज्यभरात ही छापेमारी करण्यात आली.

ED Raid
ED Raid

मुंबई : विविध बँकांची फसवणूक केल्या प्रकरणी ईडीने राज्यभरात मोठी कारवाई केली. या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ३१५ कोटी रुपयांच्या ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ईडीने ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमध्ये ही कारवाई केली. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड व मनराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी यांच्यावर करण्यात आली आहे.

Phone recording : बायकोचा फोन रेकॉर्ड कराल तर पडेल महागात! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

यांनी विविध बँकांची फसवणूक करून बेसहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप आहे. या पूर्वी देखील ईडीने जळगाव येथे मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जळगाव, नाशिक आणि ठाणे  येथील राजमल लखीचंद समूहाच्या १३ ठिकाणी धाडी टाकल्या.

यात अधिकाऱ्यांच्या हाती अनेक महत्वाची कागदपत्रे हाती लागली आहे. तसेच त्यांच्याकडे सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने देखील सापडले आहेत. एकूण ७० मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली असून ३१५ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर