मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLC Election: केंद्रीय यंत्रणांकडून ‘मविआ’च्या आमदारांना फोन, नाना पटोलेंचे आरोप
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
18 June 2022, 16:27 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
18 June 2022, 16:27 IST
  • विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना फोन येत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 

मुंबई – राज्यात राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीची धूम सुरू आहे. यामध्ये राज्यातील राजकीय वातावरण चागलंच तापलं आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने सहावी जागा जिंकत गाफिल राहिलेल्या महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला होता. भाजपहून अधिक संख्याबळ असताना देखील महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीवरून दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. २० जून रोजी १० जागांवर विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना फोन येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फोन करून या यंत्रणा महाविकास आघाडीच्या आमदारांवर दबाव टाकत आहेत. याबाबतचे फोन रेकॉर्डींग आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

धमकीच्या फोनचे आमच्याकडे रेकॉर्डिंग, योग्य वेळी दाखवू -

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पटोले म्हणाले की, “केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या काही आमदारांना फोन करत आहेत. ते फोन कसे करत आहेत,याचं रेकॉर्डींग आमच्याकडे आहे. योग्य वेळी आम्ही हे रेकॉर्डींग दाखवू. केंद्रीय तपास यंत्रणांकडून फोन करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण अशा दबावाला कुणी घाबरणार नाही,” असंही पटोले म्हणाले.

पराभवानंतर जी कारणं द्यावी लागतात, त्याची स्क्रिप्ट काँग्रेसकडून तयार -

दरम्याननाना पटोले यांच्या आरोपानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नाना पटोलेंचं विधान म्हणजे २० तारखेला लागलेल्या निकालाचे संकेत असल्याचा त्यांनी टोला लगावला आहे.प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “नाना पटोलेंचं हे जे म्हणणं आहे,ते जवळजवळ २० तारखेचा निकाल लागण्याचं लक्षण आहे. २० तारखेला काँग्रेसची एक जागा हरल्यानंतर जी कारणं द्यावी लागतात,त्याची स्क्रीप्ट नाना पटोले आताच तयार करत आहेत,”असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.