Earthquake in Sangli: चांदोली धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, पाण्याचा विसर्ग सुरु असताना पहाटे बसले हादरे
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Earthquake in Sangli: चांदोली धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, पाण्याचा विसर्ग सुरु असताना पहाटे बसले हादरे

Earthquake in Sangli: चांदोली धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, पाण्याचा विसर्ग सुरु असताना पहाटे बसले हादरे

Updated Jul 24, 2024 08:41 AM IST

chandoli dam earthquake : सांगली येथील चांदोली धरण परिसरात आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले. सध्या धरणातून पाणी सोडण्यात येत यावेळी हे हादरे बसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

चांदोली धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, पाण्याचा विसर्ग सुरु असताना पहाटे बसले हादरे
चांदोली धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, पाण्याचा विसर्ग सुरु असताना पहाटे बसले हादरे

chandoli dam earthquake in Sangli : सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे चांदोली धरण पूर्ण भरले असून सध्या या धरणातून विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग सुरू असताना आज पहाटेच्या सुमारास धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. जवळपास काही सेकंद जमिन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, प्रशासनाने देखील वाढत्या पावसामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात बुधवारी पहाटे भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी बसले. या भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरात सुमारे ८ किमी परिसरात जमिनीला मोठे हादरे बसले. या भूकंपामुळे स्थानिक नागरिक दहशतीत आहेत.

चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग

सांगली जिल्ह्यात व चांदोली धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हे धरण भरले असून सध्या धरणातून पाणी सोडले जात आहे. आज सकाळी पाण्याचा विसर्ग सुर असतांना अचानक भुकपाचे धक्के जाणवले. पहाटे ४ च्या सुमारास अनेक नागरिक हे साखर झोपेत होते. अचानक जमिन हादरल्याने नगरिकांना जग आली. भूकंप झाल्याचे समजतात त्यांनी घराबाहेर पळ काढला.

सांगलीत पावसाचा जोर वाढला

सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांनपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे येथील अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. असून पुरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या चांदोली धरणातून पाणी सोडले जात असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज झालेला भूकंप हा सौम्य असल्यामुळे चांदोली धरणाला धोका नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

मराठवाडा विदर्भात भूकंपाचे धक्के

मारठवड्यातील हिंगोली, नांदेड, जालना व वाशिम जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले होते. तब्बल ४.५ रिश्टर स्केल ऐवढी तीव्रता या भूकंपाची होती. या घटनेत देखील सुदैवाने कुणी जखमी झाले नाही, हा भूकंप देखील पहाटेच्या सुमारास झाला होता. या घटनेमुळे नागरिक दहशतीत होते. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर