एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस ६ किलोमीटर अंतरावर होता. तसेच गुजरातमधील कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० इतकी नोंद झाली.
धरण परिसरात झालेल्या भूकंपाने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.
कोयना धरण परिसरात झालेल्या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर इतकी होती, तर केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस ६ किलोमीटर अंतरावर होता. दरम्यान, कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहनही धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी केले आहे.
दिल्ली-एनसीआर, पंजाबसह चंदीगड आणि जम्मू काश्मीरमध्ये भूकंपामुळे जमीन हादरली. भूकंपाचे हे धक्के बराच वेळ जाणवत होते. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हिंदुकुश प्रदेशात रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.२ होती.