Nanded Earthquake: नांदेड हादरले! जिल्ह्यात ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanded Earthquake: नांदेड हादरले! जिल्ह्यात ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nanded Earthquake: नांदेड हादरले! जिल्ह्यात ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Updated Oct 22, 2024 09:39 AM IST

Nanded Earthquake Updates: नांदेडमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

नांदेडमध्ये ३.८ तीव्रतेचा भूकंप
नांदेडमध्ये ३.८ तीव्रतेचा भूकंप

Nanded News: नांदेडमध्ये आज (मंगळवार, २२ ऑक्टोबर) सकाळी ३.८ रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने एक्सवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, ‘नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली ५ किलोमीटर नोंदवण्यात आली. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही.’

अमरावतीत भूकंपाचे धक्के

यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी अमरावती जिल्ह्यात गेल्या महिन्यात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. चिखलदरा, धारणी, परतवाडा, अंजनगाव सुर्जी तसेच मेळघाटातील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अचलपूरपासून ४०० मीटर दूर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर