Hingoli Earthquake : मराठवाड्यातील हिंगोली येथे एक आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. पहाटे ५ वाजून ९ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसले. नागरीक साखर झोपेत असतांना अचानक जमिन हादरू लागली. यामुळे काही नागरिकांना जाग आल्याने ते घाबरून बाहेर आले. तब्बल ३.५ रिस्टर स्केल एवढी तीव्रता भूकंप मापकावर नोंदवल्या गेली. या भूकंपामुळे हिंगलो जिल्ह्यात घबराटीचे वातावरण आहे.
हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे नागरीक साखर झोपेत असतांना अचानक जमिन हादरू लागली. काही काळ हे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीच्या वसमत कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील दहा ते बारा गावांत हे भूकंपाचे धक्के बसले. अचानक आलेल्या या भूकंपामुळे नागरीक घरातून बाहेर पळून आले. सुदैवाने कुठेही आर्थिक नुकसान वा जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.
हिंगोलीत काही गावांमध्ये नेहमीच भूगर्भातून मोठे गुढ आवाज येत असतात. मात्र, आज आलेल्या भूकंपामुळे नागरिकांना खिलारी भूकंपाची आठवण झाली. सध्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.