Mumbai traffic updates : शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल, 'हे' मार्ग राहणार बंद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai traffic updates : शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल, 'हे' मार्ग राहणार बंद

Mumbai traffic updates : शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल, 'हे' मार्ग राहणार बंद

Published Oct 11, 2024 04:20 PM IST

Dasara Melava Shivaji Park : मुंबईतील दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मुंबई पोलिसांनी विविध भागांतील वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. तसंच, ठराविक ठिकाणी पार्किंगवरही बंदी घातली आहे.

Mumbai traffic updates : दसरा मेळाव्यामुळं मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' ठिकाणी पार्किंग बंद
Mumbai traffic updates : दसरा मेळाव्यामुळं मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' ठिकाणी पार्किंग बंद

Shiv Sena UBT Dasara Melava : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी या संदर्भात अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यानुसार, दादर भागातील काही रस्ते बंद राहणार आहेत तर काही ठिकाणी पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे.

शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येत असतात. त्यामुळं प्रचंड गर्दी उसळते. अशा वेळी गैरसोय होऊ नये म्हणून दरवर्षी पोलिसांकडून वाहतुकीत बदल केला जातो. त्याचप्रमाणे यंदा काही निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. वाहतुकीतील बदलाचा तपशील पुढीलप्रमाणे…

'हे' रस्ते राहणार बंद

> सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून एसव्हीएस रोडवरील माहीममधील कापड बाजार जंक्शनपर्यंतचा रस्ता बंद राहील. प्रवासी सिद्धिविनायक जंक्शन, एस. के. बोले रोड, आगर बाजार, गोखले रोड आणि पोर्तुगीज चर्च गेट मार्गाचा वापर करू शकतात.

> राजा बडे चौकापासून उत्तर जंक्शनमधील केळुसकर मार्ग बंद राहणार आहे. या मार्गाऐवजी एलजे रोड, स्टील मॅन जंक्शन आणि गोखले रोड हा पर्यायी मार्ग आहे.

गडकरी चौक जंक्शन ते केळुसकर रोड (दक्षिण) दादर रोड असा प्रवास करायचा असल्यास प्रवाशांनी एमबी राऊत मार्गाचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

जंक्शनवरील सेनापती बापट मार्ग ते एलजे मार्ग ते मनोरमा नगरकर मार्ग या मार्गावरील वाहतूक देखील वळवण्यात आली आहे.

खालील ठिकाणी पार्किंगवर बंदी

एल जे रोड (राजबडे जंक्शन ते गडकरी जंक्शन)

एसव्हीएस रोड (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक)

दादरमधील एनसी केळकर मार्ग (गडकरी ते हनुमान मंदिर जंक्शन)

दादरचा केळुसकर रोड (दक्षिण आणि उत्तर)

लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग (गडकरी जंक्शन ते हनुमान मंदिर जंक्शन)

एमबी राऊत रोड (एसव्हीएस रोडसह जंक्शनवरून)

दादासाहेब रेगे मार्ग (सेनापती बापट पुतळा ते गडकरी जंक्शन)

पांडुरंग नाईक रोड (एमबी राऊत रोड)

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर