BMC declared holiday for the first session School College: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. रविवार पासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सकाळ पासून देखील मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. तब्बल ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला असल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे लोकल सेवेवर देखील परिमाण झाला आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार असल्याने मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रासाठी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच कामाला जाणाऱ्या नोकरदार वर्गाला देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत रविवार पासून जोरदार पाऊस सुरू आहे. मध्य रात्री देखील जोरदार पाऊस झाला आहे. तर आज सकाळ पासून देखील पावसाची तीव्रता वाढली आहे. मध्यरात्री १ ते सकाळी ७ पर्यंत तब्बल ३०० मीमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस ढगफूटी सदृश्य असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई उपनगरातील व पालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना पहिल्या सत्रात सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. तर पावसाचा जोर वाढणार असल्याने दुसऱ्या सत्रातील शाळांसाठी देखील सुट्टी जाहिर करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. तर कामाला जाणाऱ्या नागरिकांना आज घराबाहेर पडू नये आशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे. त्यांनी घरूनच काम करावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने येथील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.
मुंबईत रविवार पासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे ओढ्या नाल्यांना देखील पुर आला आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ तर उपनगरात असल्फा, साकीनाका, जेबी नगर, विक्रोळी, घाटकोपर आदि परिसरात पाणी साचले आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले असून या पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना जावे लंगत आहे. यामुळे वाहतूक कोंडी देखील होत आहे.
संबंधित बातम्या