Accident In Baramati : बारामती येथे पालखी मार्गावर भीषण अपघात झाला आहे. बारामतीतील राष्ट्रीय महामार्ग रुई लीमटेक रस्त्यावर भरधाव कारचा टायर फुटून कार उलटली. या भीषण दुर्घटनेत इंदापूचे काँग्रेस नेते व तालुकाध्यक्ष यांच्या २२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आदित्य आबासाहेब निंबाळकर असे मृत तरुणाचं नाव आहे.
इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांच्यावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. बारामती तालुक्यातील रुई गावच्या पाटीजवळ हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेला माहितीनुसार आदित्य हा काटेवाडीकडून रुई मार्गे बारामतीला जात होता. यावेळी त्याच्या कारचा टायर अचानक फुटला. गाडी वेगात असल्याने आणि टायर फुटल्याने गाडी महामार्गावर पलटी झाली. व एका इमारतीच्या कडेला जाऊन धडकली. या भीषण आपगतात आदित्य निंबाळकर हा गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने अपघात झालेल्या गाडीकडे धाव घेतली.
तसेच जखमी आदित्यला बाहेर काढले. त्याची परिस्थिती खूप गंभीर होती. त्याला तातडीने उपचार करण्यासतही दवाखान्यात भरती करण्यात आले. या अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना व आदित्यच्या कुटुंबीयांना दिली. आदित्यवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, या अपघातात तो गंभीर जखमी झाला असल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आदित्यच्या मृत्यूमुळे निंबाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे बारामती व इंडपऊर तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे.
हडपसर येथील सामाजिक कार्यककर्ते सचिन शहाजी शेलार (वय ३२, काळेबोराटे नगर हडपसर) यांच्या कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी १२ आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास १ वर्ष कारावासाची शिक्षा, व दंडामधील १० लाख रुपयांची रक्कम सामाजिक कार्यकर्त्याच्या पत्नीला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हे आदेश दिले आहेत. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार अनिल तुकाराम सोमवंशी, अमित अर्जुन फल्ले, धनाजी आनंदा वनांगडे, अनिल सुभाष राख, आशुतोष अशोक बुट्टे पाटील, धीरज अनिल ढगरे, गणेश रामानु चव्हाण, अनिल बापू माने, राजेंद्र रावसाहेब कांबळे, अमित चंद्रकांत घाडगे, जगन्नाथ केरबा चौगुले, बाबासाहेब भगवान हरणे यांना शिक्षा देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या