Pune Accident : पुण्यात मद्यधुंद टेम्पो चालकाचा प्रताप! चार ते पाच वाहनांसह नागरिकांना उडवलं; महिला ठार, दोघे जखमी-drunken tempo driver runs over eight people in kothrud paud fata pune ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : पुण्यात मद्यधुंद टेम्पो चालकाचा प्रताप! चार ते पाच वाहनांसह नागरिकांना उडवलं; महिला ठार, दोघे जखमी

Pune Accident : पुण्यात मद्यधुंद टेम्पो चालकाचा प्रताप! चार ते पाच वाहनांसह नागरिकांना उडवलं; महिला ठार, दोघे जखमी

Sep 09, 2024 10:16 AM IST

Pune Accident : पुण्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. पुण्यात दारू बंदी असतांना सुद्धा एका मद्यपी टेम्पो चालकाने चार ते पाच वाहनांना उडवल्याची घटना रविवारी रात्री घडली.

पुण्यात मद्यधुंद टेम्पो चालकाचा प्रताप! चार ते पाच वाहनांसह नागरिकांना उडवलं; महिला ठार, दोघे जखमी
पुण्यात मद्यधुंद टेम्पो चालकाचा प्रताप! चार ते पाच वाहनांसह नागरिकांना उडवलं; महिला ठार, दोघे जखमी

Pune Accident : पुण्यात दारूच्या नशेत आलीशान पोर्शे कार चालवून एका बड्या धनिक पुत्राने दोघांचा जीव घेतला होता. यानंतर नुकतेच जेवण दिले नाही म्हणून एका दारुड्याने पुण्यातील इंदापूर येथे ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसवला होता. या घटना ताज्या असतांना आता पुण्यात रविवारी रात्री कोथरूड येथे पौड फाटा येथे एका मद्यधुंद टेम्पोचालकाने दारूच्या नशेत अनेक वाहनांना धडक दिल्याचं उघड झालं आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर  ७ ते ८ जण जखमी असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहे. मद्यपी चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आशीष पवार असे आरोपी टेम्पोचालकाचे नाव आहे.  गीतांजली अमराळे असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या माहीलेचे नाव आहे. गीतांजली या  मनसे  पदाधिकारी श्रीकांत अमराळे यांच्या पत्नी आहेत. त्याने श्रीकांत आणि  गीतांजली अमराळे या दाम्पत्याला चिरडले.

   पुण्यातील कोथरूड येथील करिश्मा चौकात सिग्नल जवळ या मद्यधुंद टेम्पोचालकाने आधी दोन लहान मुलांना धडक दिली. मद्यपी टेम्पो चालकाने गाडी न थांबवता टेम्पो तसाच पुढे दामटला. पुढे जाऊन त्याने आणखी काही गाड्यांना धडक दिली. पौड फाटा येथे सावरकर उड्डाण पुलाजवळील सिग्नलला धडक देऊन तो तोडला. यानंतर त्याने एका कारला टेम्पो धडवकावला. कोथरूड येथील करिश्मा चौकापासून ते पौड फाट्यापर्यंत टेम्पोचालकाने सात ते आठ जणांना धडक दिली.

तब्बल ७ ते ८ जणांना टेम्पोचालकाने धडक दिली. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे गोंधळ उडाला. नागरिकांनी या टेम्पो चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला पौड फाटा येथे पकडण्यात आले. दरम्यान, जखमींना तातडीने सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. टेम्पो चालक दारूच्या ऐवढ्या आहारी गेला होता की त्याला नीट उभे देखील राहता येत नव्हते व डोळेही उघडले जात नव्हते. नागरिकांनी टेम्पो चालकाला चांगलाच चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले.

इंदापूर येथे जेवण दिले नाही म्हणून दारुड्या ड्रायवरने हॉटेलमध्ये घुसवला ट्रक

इंदापूर येथे देखील दोन दिवसांपूर्वी एका दरुड्याने धिंगाणा घातला. त्याला जेवण दिले नाही म्हणून दारूच्या नशेत असलेल्या ट्रक चालकाने ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसवला. या घटनेत हॉटेलचे मोठे नुकसान झाले. पुणे सोलापूर मार्गावरील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Whats_app_banner
विभाग