मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेबाज युवक- युवती; अभिनेते रमेश परदेशींनी लाईव्ह करत प्रकार आणला पुढे; व्हिडिओ व्हायरल

पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेबाज युवक- युवती; अभिनेते रमेश परदेशींनी लाईव्ह करत प्रकार आणला पुढे; व्हिडिओ व्हायरल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 26, 2024 10:56 AM IST

drunken girls found on vetal hill : पुणे पोलिसांनी तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केल्याची घटना ताजी असतांना पुण्यात वेताळ टेकडीवर नशेमध्ये धूत असलेल्या तरुणींचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

drunken girls found on vetal hill
drunken girls found on vetal hill

drunken girls found on vetal hill : पुणे पोलिसांनी तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स काही दिवसांपूर्वी जप्त केले होते. पुणे पोलिसांच्या या कामगिरीमुळे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तालयात जात नाशमुक्त महाराष्ट्राची घोषणा दिली असतांना त्याच दिवशी पुण्याच्या वेताळ टेकडीवर ड्रग्स आणि मद्यपान करून नशाधुंद अवस्थेत काही तरुणी आढळल्या. या तरुणींना आपण कोठे आहोत आणि कोणत्या अवस्थेत आहोत याची देखील शुद्ध नव्हती. याच वेळी येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेले अभिनेते रमेश परदेशी यांनी याचे लाईव करत अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या युवकांच्या पालकांनी जागरूक व्हावे, असे आवाहन केले. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पुण्याची तरुणाई चालली कुठे हा प्रश्न उपस्थित करण्यात आल आहे.

Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक, जालन्यात एसटी महामंडळाची बस पेटवली

पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी, कुरकुंभ, सोलापूर, सांगली, दिल्ली या ठिकाणी कावई करत तब्बल हजार किलोहून अधिक मेफेड्रोन जप्त करत ड्रग्स तस्करांचे कंबरडे मोडले होते. तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपयांचे ही ड्रग्स असून या कारवाईचे कौतूक करण्यात आले. या साठी देवेंद्र फडणवीस हे शनिवारी पोलीस आयुक्तालयात येत त्यांनी पोलिसांच्या पथकाला २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच नशा मुक्त महाराष्ट्र करण्याची शपथ देखील त्यांनी घेतली होती. दरम्यान, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी वेताळ टेकडी परिसरात युवक-युवती नशेत आढळून आल्याने खळबळ उडाली. हे तरुण बेधुंद होते. आपण कोठे आहोत, आजूबाजूला काय चालले आहे, या बद्दल काहीही माहिती नव्हते.

राजकीय पक्षांना द्यावा लागतो का इन्कम टॅक्स? काय सांगतो कायदा! वाचा

अभिनेते रमेश परदेशी ही त्यांच्या काही मित्रांसोबत वेताळ टेकडीवर फिरायला गेल्यावर त्यांना काही तरुणी या नशेत धुंद असल्याचे आढळले. त्यांनी त्यांना सवरण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्यांना काहीही सुचत नव्हते. पुण्यातील तरुणांची ही अवस्था त्यांना पहावली गेली नाही. या साठी त्यांनी पालकांमध्ये जागृती करण्यासाठी या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करत पालकांनी वेळीच सावध होण्याचे आवाहन केले. दरम्यान, परदेशी यांनी या मुलींना दवाखान्यात भरती केले. मात्र, तरुणींची प्रकृती ही गंभीर असल्याने काही उपचार करून त्यांना दुसऱ्या दावखण्यात हलवण्यात आले. सध्या या तरुणींची प्रकृती ही स्थिर आहे.

पुण्यातील टेकड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे पुण्यातील टेकड्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात फर्ग्युसन टेकडी, तळजाई टेकडी, वेताळ टेकडी, पाषाण टेकडी येथे फिरायला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, रात्रीच्या वेळी अनेक गैरप्रकार या ठिकाणी चालतात.

IPL_Entry_Point

विभाग