मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Dhanori accident: पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राइव! धानोरीत भरधाव कारने रिक्षाला उडवले, चौघे जखमी

Pune Dhanori accident: पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राइव! धानोरीत भरधाव कारने रिक्षाला उडवले, चौघे जखमी

Jun 17, 2024 11:37 AM IST

Pune Dhanori accident: पुण्यात अपघाताचे सत्र काही केल्या थांबण्याची चित्र दिसत नाही. काल रात्री एका कार चालकाने धानोरी येथे एका रिक्षाला धडक दिल्याने चौघे जखमी झाले आहेत.

पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राइव! धानोरीत भरधाव कारने रिक्षाला उडवले, चौघे जखमी
पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राइव! धानोरीत भरधाव कारने रिक्षाला उडवले, चौघे जखमी

Pune Dhanori accident: पुण्यात पोर्शे प्रकरण ताजे असतांना ड्रिंक अँड ड्राइवच्या घटना घडतच आहेत. रविवारी रात्री धानोरी येथे एका भरधाव कारने उभ्या असलेल्या एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक आणि रिक्षातील महिला आणि लहान मुले असे चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तनावाचे वातावरण होते.

ट्रेंडिंग न्यूज

या घटनेचे वृत्त असे की, पुण्यातील धानोरी परिसरात रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर हा अपघात झाला. भरधाव वेगात असणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली. यात रिक्षात असलेले चौघेजण जखमी झाले आहेत. आरोपी कारचालकाला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार रिक्षा चालक हा त्याच्या कुटुंबियासोबत आईस्क्रीम खाण्यासाठी थांबला होता. रिक्षामध्ये दोन महिला व लहान मुलगी होती. याचवेळी पोरवाल रस्त्यावर एका भरधाव त्यांच्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. जखमी रिक्षा चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारचालक असलेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे कार चालवतांना तो दारूच्या नशेत होता का याची तपासणी केली जाणार आहे.

पुण्यात कात्रज चौकात तरुणीला बसने चिरडले

पुण्यात कात्रज चौकहात शनिवारी रात्री बसने एका तरुणीला चिरडले. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री ८.३० च्या सुमारास घडली. श्वेता चंद्रकांत लीमकर (वय २५ मुळ रा.कोल्हापूर) असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. पकात्रज चौकामध्ये शनिवारीसव्वा आठच्या दरम्यान एसटीचादुचाकीला धक्का लागला व चाकाखाली येऊन कोल्हापूर येथील तरुणीचा मृत्यू झाला.

WhatsApp channel
विभाग