मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Drugs racket: पुण्यात तयार झालेल्या ड्रग्सची दिल्लीमार्गे थेट लंडनला तस्करी; तपासात उघड

Pune Drugs racket: पुण्यात तयार झालेल्या ड्रग्सची दिल्लीमार्गे थेट लंडनला तस्करी; तपासात उघड

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 22, 2024 08:16 AM IST

Pune Drugs racket: पुणे पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत तब्बल ३ हजार कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे. पुण्यात तयार होणारे हे ड्रग्स दिल्ली मार्गे लंडनला पाठवले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Pune Police seized 1100 core drugs from kurkumbh MIDC
Pune Police seized 1100 core drugs from kurkumbh MIDC

Pune Drugs racket: पुणे पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत ड्रग्स तस्करांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. पुणे, दिल्ली, सांगलीसह अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमरीत आता पर्यंत ३ हजार २७६ कोटी रुपयांचे १ हजार ६८८ किलोग्राम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ड्रग्स तस्करीचे आंतरराष्ट्रीय सिंडीकेट पोलिसांनी उघड केले असून पुण्यात तयार होते ड्रग्सची दिल्ली मार्गे थेट लंडनला विक्री होत होती.

शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्राची मोठी घोषणा! उसाच्या एमएसपीमध्ये तब्बल ८ टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या नवीन किंमत

ललित पाटील पाटील प्रकरणाचा पर्दाफाश झाल्‍यानंतर आता पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करी प्रकरणी गेल्या तीन दिवसांत मोठ्या कारवाया केल्या आहे. पुण्यातील विश्रांतवाडी, दौंड तालुक्यातिल कुरकुंभ येथील करखान्यातून १४०० कोटींचे तब्‍बल ७०० किलो ड्रग्ज जप्‍त करण्यात आले. तर दिल्ली येथून तब्बल ८०० कोटी रुपये किमतीचे ४०० किलो एमडी जप्त केले. त्यानंतर काल सांगली येथे किपवाद येथे तब्बल ३०० किलो ड्रग्स जप्त करण्यात आले. सध्या या प्रकारणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सॅम आणि ब्राऊ नावाच्या तस्करांच्या शोध पुणे पोलिस करत आहेत.

salary increment: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पगार वाढ! यावर्षी ९.५ टक्के वाढ अपेक्षित, सर्वेक्षणात माहिती उघड

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, पुणे जिल्ह्यात उत्पादित केलेले अंमली पदार्थ थेट कुरिअर द्वारे लंडनला पाठवले जात होते. या मागे मोघे सिंडिकेट असून हे दिल्लीहून लंडनमध्ये पुण्यात तयार होणाऱ्या ड्रग्सची तस्करी करत असल्याचे तपसात उघड झाले आहे. आता पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत आम्ही राष्ट्रीय राजधानीतून १ कोटी ८४० कोटी किमतीचे ९७० किलो एमडी जप्त केले आहे. हे ड्रग्स कुरिअर सेवेचा वापर करून सिंडिकेटद्वारे दिल्लीहून लंडन आणि विविध देशात तस्करीसाठी पाठवले जात होते.

पोलिसांनी वैभव उर्फ पित्या भरत माने (वय ४० सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, नवी पेठ), हैदर नूर शेख (वय ४०, विश्रांतवाडी), भीमाजी परशुराम साबळे (वय ४६, पुणे), युवराज भुजबळ (वय ४१, डोंबिवली) यांना अटक केली आहे. दिवेश चिरंजीत भुतिया (नवी दिल्ली), संदीप राजपाल कुमार (नवी दिल्ली), संदीप हनुमानसिंग यादव (नवी दिल्ली) भारतीय वंशाचा परदेशी नागरिक सॅम ब्राउन हे फरार आहेत.

बुधवारी पोलिसांनी सांगलीतील कुपवाड एमआयडीसीमधील अर्थ केम लॅबोरेटरीजच्या दुसऱ्या युनिटवर छापा टाकून ३०० कोटी रुपयांचे १५० किलो एमडी जप्त केले आणि अयुब मकानदार (वय ४४) याला या प्रकरणी अटक केली.

गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीतील काटोल मुबारक दक्षिण विस्तार भाग क्रमांक १ आणि दक्षिण विस्तार भाग क्रमांक २ मधील दोन लगतच्या दुकानांवर छापा टाकून ९७० किलो एमडी जप्त केले. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) अर्थ केम कारखान्याला २०२२ पासून नियम पाळले नसल्याने हा कारखाना बंड करण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांच्या या कारवाईचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कौतुक केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग