मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  खबरदार! पुण्यात दारू पिऊन वाहन चालवल्यास आता थेट परवाना होईल रद्द! पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

खबरदार! पुण्यात दारू पिऊन वाहन चालवल्यास आता थेट परवाना होईल रद्द! पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Jul 10, 2024 01:49 PM IST

Pune Police action on drunk and Drive : पुण्यात दारू पिऊन गाडी चलवण्यास आता थेट वाहनचालवण्याचा परवाना रद्द केला जाणार आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

खबरदार! पुण्यात दारू पिऊन वाहन चालवल्यास आता थेट परवाना होईल रद्द! पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
खबरदार! पुण्यात दारू पिऊन वाहन चालवल्यास आता थेट परवाना होईल रद्द! पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Pune Police drunk and drive action : पुण्यात गेल्या काही दिवसांत ड्रंक अँड ड्राइवच्या घटना वाढल्या आहेत. दारु पिऊन हिट अॅण्ड रनच्या घटना देखील वाढल्या आहेत. पुण्यातील पोर्शे अपघातानंतर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. मात्र, असे असतांना देखील दारू पिऊन वाहने चालवण्याच्या घटना काही कमी झाल्या नअसल्याने पुणे पोलिसांनी आता कठोर पावले उचलली आहे. या पुढे जर कुणी दारू पिऊन गाडी चालवतांना आढळल्यास त्याचा थेट परवाना रद्द केला जाणार आहे.

या बाबत पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात कल्याणी नगर येथे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून दोघांना चिरडल्यानंतर ड्रंक अँड ड्राइव्हचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी या विरोधात कारवाई ही तीव्र केली होती. 

ट्रेंडिंग न्यूज

मात्र, दंड घेऊन वाहनचलकांना सोडले जात होते. पुणे पोलिसांनी गेल्या ६ महिन्यात १ हजार ६४८ जणांवर दारू पिऊन वाहन चालवल्या प्रकरणी कारवाई केली असून त्यांच्याकडून मोठा दंड देखील वसूल केला आहे. तर काही जणांवर दारू पिऊन वाहन चालवल्याने खटले देखील दाखल करण्यात आले आहे. 

मात्र, जर आता कुणी दारू पिऊन गाडी चालवली तर त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स सुरुवातीला ३ महिने आणि त्यानंतर पुन्हा हाच गुन्हा केला तर ६ महिन्यापर्यंत वाहन परवाना रद्द केला जाणार आहे. जर त्याच व्यक्तीने तोच गुन्हा पुन्हा केला तर त्याचा वाहन परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे.

पुण्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास बोपीडी येथे मद्यधुंद कार चालकाने गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना उडवले होते. या अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. या पूर्वी देखील पुण्यात दारू पिऊन गाडी चालवून अनेक अपघात झाले आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चलतांना भीती वाटू लागली आहे.

WhatsApp channel
विभाग