Mumbai Accident News: मुंबईतील वांद्रे वांद्रे-वरळी सी लिंकवर शुक्रवारी अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने जाणारी कार पलटी झाली. या अपघातात कारचालक जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाची सुटका केली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे-वरळी सी लिंकवर शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी कार पलटी झाली. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि सी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाची सुटका केली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण कार चालक किरकोळ जखमी झाल्याचे समजत आहे.
या घटनेनंतर सी लिंकवरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. उलटलेली कार आणि संथ गतीने वाहणाऱ्या वाहनांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या