मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Honey Trap : धक्कादायक.. प्रदीप कुरुलकरानंतर हवाई दलाचा अधिकारीही पाकच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये, एटीएसचा दावा

Honey Trap : धक्कादायक.. प्रदीप कुरुलकरानंतर हवाई दलाचा अधिकारीही पाकच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये, एटीएसचा दावा

May 15, 2023 07:04 PM IST

DRDOhoneytrapcase : डॉ. प्रदीप कुरूलकरयांच्यासह भारतीय हवाई दलाचा एक अधिकारीदेखील पाकिस्तानी हनी ट्रॅपमध्ये अडकून पाक गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

DRDO honey trap case
DRDO honey trap case

डीआरडीओ अधिकारी प्रदीप कुरुलकर पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजली असताचाच आता या प्रकरणी आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉ. प्रदीप कुरूलकर यांच्यासह भारतीय हवाई दलाचा एक अधिकारीदेखील पाकिस्तानी हनी ट्रॅपमध्ये अडकून पाक गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. निखील शेंडे असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते बंगळुरूमध्ये कार्यरत आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

भारताची गोपनीय माहिती पाकला पुरवल्याप्रकरणी एटीएसच्या अटकेत असणारे आरोपी डॉ. प्रदीप कुरुलकर  याची एटीएस कोठडी मुदत संपल्याने कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने कुरुलकरांना मंगळवारपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ. प्रदीप कुरुलकर याच्यासह निखिल शेंडे हे भारतीय हवाईदलातील अधिकारीही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. पाकिस्तानमधील ज्या आयपी अ‍ॅड्रेसवरुन डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्याशी संपर्क साधण्यात येत होता, त्याच आयपी अ‍ॅड्रेसवरून निखिल शेंडे यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे.

डीआरडीओचे आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याचे समोर आल्याने त्यांनी कोणती माहिती पाकला पुरवली, याचा तपास केला जात आहे. या अधिकाऱ्याचीही आता पुणे एटीएसकडून चौकशी होणार आहे. शेंडे हे बंगळुरू हवाई दलाचे अधिकारी आहेत. भारतीय हवाई दलाचे पथक निखील शेंडे यांची चौकशी करत आहेत.

प्रदीप कुरुलकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून वन प्लस 6T हा मोबाईल जप्त करण्यात आला होता. एटीएसने तो मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला मात्र तो मोबाईल डिकोड झाला नाही. आज पुन्हा या मोबाईलचा ताबा एटीएसने घेतला. मोबाईल उघडून एटीएसने मोबाईलमधले स्क्रीनशॉट घेतले आहेत. या सगळ्याचा तपास आणि चौकशी करण्यासाठी एटीएसकडून न्यायालयात एका दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत कुरुलकर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

WhatsApp channel
विभाग