मंत्रीपदाच्या यादीत असलेलं माझं नाव अचानक का वगळलं गेलं माहीत नाही: सुधीर मुनगंटीवार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मंत्रीपदाच्या यादीत असलेलं माझं नाव अचानक का वगळलं गेलं माहीत नाही: सुधीर मुनगंटीवार

मंत्रीपदाच्या यादीत असलेलं माझं नाव अचानक का वगळलं गेलं माहीत नाही: सुधीर मुनगंटीवार

Dec 17, 2024 02:08 PM IST

Sudhir Mungantiwar : देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, एक दिवसापूर्वी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव होते पण नंतर ते काढून टाकण्यात आले.

मंत्रीपदाच्या यादीतून माझं नाव का वगळलं ते कळले नाही; सुधीर मुनगंटीवार यांचा दावा
मंत्रीपदाच्या यादीतून माझं नाव का वगळलं ते कळले नाही; सुधीर मुनगंटीवार यांचा दावा (PTI)

Sudhir Mungantiwar : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा रविवारी संध्याकाळी विस्तार करण्यात आला. अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीपदाच्या यादीतून डच्चू देण्यात आला आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचे देखील नाव वगळण्यात आले आहे. यावर त्यांनी भाष्य केलं आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एक दिवसापूर्वी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव होते पण नंतर ते काढून टाकण्यात आले. मात्र, यामुळे ते नाराज किंवा निराश नाही. हा पक्षाच्या निर्णय असून तो मान्य आहे. मी संघटनात्मक कार्यकर्ता आहे असे देखील ते म्हणाले.

नागपुरात बोलतांना माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी माझ्या विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी काम करत राहणार आहे. लोकहिताचे मुद्दे मी विधानसभेत मांडणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षनेतृत्व मुनगंटीवार यांच्याकडे आणखी काही भूमिका सोपवण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी मुनगंटीवार यांच्याशी बोललो आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत.

मुनगंटीवार यांचा दावा

सुधीर मुनगंटीवार यांनी दावा केला आहे की, यापूर्वी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत आपले नाव असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर नाव वगळण्यात आले. याबाबत मला काळजी करण्याचे कारण नाही कारण पक्ष माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवतो, ती मी पार पाडतो. एवढेच की माझे नाव मंत्र्यांच्या यादीत असल्याचे सांगण्यात आले. नाव यादीतून का काढले ते मला माहीत नाही.

पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज आहे असे होत नाही. तसे असल्यास मला याची माहिती दिली जाईल. कदाचित पक्षाने माझ्यावर आणखी काही जबाबदारी निश्चित केली असेल. दरम्यान, मुनगंटीवार यांनी सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत ते म्हणाले की, ही भेट थोरल्या आणि लहान भावाची होती. अशा गोष्टी समोर आल्या की मी त्यांचे मार्गदर्शन घेतो.

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारांतर्गत महायुतीच्या मित्रपक्षांच्या एकूण ३९ आमदारांनी रविवारी नागपूरच्या राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपला १९, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ११ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे मिळाली आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर