मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: डोंबिवलीत कौटुंबिक वादातून महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी; शेजाऱ्यानं काढला व्हिडिओ

Viral Video: डोंबिवलीत कौटुंबिक वादातून महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी; शेजाऱ्यानं काढला व्हिडिओ

Jun 24, 2024 10:28 AM IST

Dombivli Woman Attempts Suicide: डोंबिवली येथे एका महिलेने कौटुंबिक वादातून चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

डोंबिवली: महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी
डोंबिवली: महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी

Dombivli Shocking Video: डोंबिवलीत कौटुंबिक वादातून एका महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती उमा भारती असे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतलेल्या महिलेचे नाव आहे. प्रीती या आपल्या कुटुंबासह ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संबंधित महिला आधीच रेलिंगच्या मागे उभी आहे. शेजारचे लोक तिला उडी मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, या महिलेने कोणाचेही ऐकले नाही आणि चौथ्या मजल्यावरून उडी मारते. त्यानंतर ती जमिनीवर पडते आणि बेशुद्ध होते. शेजारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार त्याच्या मोबाईमध्ये कैद केला.

ट्रेंडिंग न्यूज

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संबंधित महिलेला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. कौटुंबिक वादातून महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे, अशी माहिती समोर आली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

डोंबिवली: पत्नीच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्यानं पतीची आत्महत्या

याआधी डोंबिवलीत एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका ५७ वर्षाच्या व्यक्तीने दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्नीच्या मृत्युचे दु:ख सहन न झाल्यामुळे संबंधित व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. मृत व्यक्तीच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी एका अपघातात निधन झाले. तेव्हापासून ते नैराश्यात होते. पत्नीच्या मृत्युला तीन महिने झाल्यानंतरही ते स्वत:ला दु:खातून सावरु शकले नाहीत. पत्नीशिवाय जगणे सहन होत नसल्याने ते वारंवार मरणाची इच्छा व्यक्त करत असे, अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली. अखेर मंगळवारी (१८ जून २०२४) मृत व्यक्तीने दहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. मृत व्यक्ती पलवा सिटीतील कासार इस्टेट मध्ये राहत होती. घटनेच्या वेळी त्यांचा २९ वर्षीय मुलगा आणि कुटुंबातील इतर दोन सदस्य घरात होते. याप्रकरणी डोंबिवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

WhatsApp channel
विभाग