दुबईला जाण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं, पासपोर्ट व्हेरिफिकेशननंतर घरी येताना डंपरनं उडवलं, महिलेचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दुबईला जाण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं, पासपोर्ट व्हेरिफिकेशननंतर घरी येताना डंपरनं उडवलं, महिलेचा मृत्यू

दुबईला जाण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं, पासपोर्ट व्हेरिफिकेशननंतर घरी येताना डंपरनं उडवलं, महिलेचा मृत्यू

Jun 03, 2024 11:54 AM IST

Dombivli Dumper and Bike Accident: डोंबिवलीत डंपर आणि दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला.

डोंबिवलीत डंपरच्या धडकेत एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
डोंबिवलीत डंपरच्या धडकेत एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

Dombivli Samrat Ashok Chowk Accident: डोंबिवली पश्चिमेतील सम्राट अशोक चौकात रविवारी (०२ जून २०२४) दुपारी भरधाव डंपरच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. मृत महिला आपल्या पतीसह पासपोर्ट व्हेरिफिकेशनचे काम आटोपून घरी जात असताना हा अपघात घडला. या अपघातानंतर संबंधित दाम्पत्याला तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. जिथे महिलेला मृत घोषित करण्यात आले. तर, तिच्या पतीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली.

स्नेहा दाभिलकर (वय, ५२) असे मृत महिलेचे नाव आहे. स्नेहा यांचे पती अशोक दाभिलकर हे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी ते निवृत्त झाले. पतीच्या निवृत्तीनंतर स्नेहा यांनी कुटुंबासह दुबईला फिरायला जाण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी पासपोर्ट देखील काढला. दरम्यान, रविवारी त्या पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गेल्या. मात्र, घरी परत येताना डोंबिवली पश्चिमेतील सम्राट अशोक चौकात त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यानंतर स्नेहा डंपरच्या मागच्या चाकाखाली गेल्या आणि अशोक हे दुसऱ्या बाजूला पडले. त्यांना तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले, तेथे स्नेहाला मृत घोषित करण्यात आले आणि अशोकवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

डंपर चालकाला अटक

याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (अ), २७९ आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्ट कार्यालयात जाण्याचे कारण अशोकने कुटुंबीयांसह परदेशात जाण्याचा बेत आखला होता. जेवण करून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. डंपर चालक संतोष साळवे याला अटक करण्यात आली असून तो पोलिस कोठडीत आहे.

दुबईला फिरायला जाण्यापूर्वीच काळाचा घाला

स्नेहा या सहा महिन्यापूर्वीच आपल्या कुटुंबासह स्वामीनारायण सिटीमध्ये राहायला आल्या होत्या. अशोक हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांनी उरलेला वेळ कुटुंबासोबत घालवण्याचा विचार केला. यासाठी दुबईला फिरायला जाण्याचे ठरवसे होते. मात्र, त्यापूर्वीच काळाने या कुटुंबावर घाला घातला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर