Dombivali: डोंबिवलीत अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या, परिसरात खळबळ!-dombivali mother kills toddler dies by suicide investigation underway ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dombivali: डोंबिवलीत अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या, परिसरात खळबळ!

Dombivali: डोंबिवलीत अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या, परिसरात खळबळ!

Sep 24, 2024 01:59 PM IST

Dombivali Murder and Suicide: ठाण्यातील डोंबिवली परिसरात पोटच्या मुलीची हत्या करून महिलेने आत्महत्या केली.

डोंबिवलीत अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या
डोंबिवलीत अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

Dombivali News: ठाण्यातील डोंबिवली परिसरात पोटच्या मुलीची हत्या करून एका महिलेने आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटस्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृत महिलेने आपल्या मुलीची हत्या करून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचा पोलीस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा सकपाळ (आई, वय-२९) आणि समृद्धी सकपाळ (मुलगी) अशी राहत्या घरात मृत अवस्थेत आढळलेल्या माय- लेकीचे नावे आहेत. दरम्यान, रविवारी दुपारी रात्री ८ वाजता पूजाचा पती राहुल सकपाळ घरी परतला असता त्याला पत्नी पूजा लटकलेल्या आणि मुलगी समृद्धी बेडवर बेवारस अवस्थेत पडलेली दिसली. त्याने त्वरीत शेजाऱ्यांना आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोघांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

याप्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली. मानपाडा पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कडबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलीस शेजाऱ्यांची चौकशी करीत आहे. पूजाने आपल्या मुलीची हत्या करून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? यामागील पोलीस कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.

मुंबई: ऑनलाइन गेमिंगच्या वेडापायी टॅक्सी चालकाची आत्महत्या

ऑनलाइन गेमिंगच्या नादातून टॅक्सी चालकाने मुंबईतील वरळी सी लिंक वरून उडी मारून आत्महत्या केली. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्री अंधार आणि समुद्राच्या उंच लाटांमुळे मृतदेह शोधण्यात अडचण येत असल्याने शोध मोहीम थांबण्यात आले. शनिवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास त्याचा दादर येथे सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, अल्ताफ मोहम्मद हुसेन असे मृत व्यक्तीचे नाव असून तो गोवंडी येथील रहिवाशी आहे. हुसेनला ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन होते.

भारतात आत्महत्या कायद्याने गुन्हा

भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा मानसिक तणावातून लोक आत्महत्येचा निर्णय घेतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. यामुळे कोणतीही समस्या किंवा अडचण असेल तर, सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल, याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणती चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील मोठ्या आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.

 

Whats_app_banner
विभाग