मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाणे : अचानक एकापाठोपाठ ६ कुत्र्यांचा मृत्यू, परिसरात खळबळ; धक्कादायक कारण आले समोर

ठाणे : अचानक एकापाठोपाठ ६ कुत्र्यांचा मृत्यू, परिसरात खळबळ; धक्कादायक कारण आले समोर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 25, 2024 10:34 PM IST

Thane news : ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी भागात एका पाठोपाठ सहा कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी परिसरात खळबळजनक घटना समोर आली आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांचा अनानक मृत्यू होऊ लागला आहे. लोकांचे म्हणणे आहे की, या कुत्र्यांना जाणून-बुजून कोणीतरी मारत आहे. तपास केला असता याचे कारण समोर आले आहे. समोर आले आहे की, या सहा कुत्र्यांना विष देऊन मारले आहे.

पोलिसांनी सांगितले की, भिवंडी निवासी मनीषा पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली की, त्यांच्या दोन पाळीव कुत्र्यांना २१ फेब्रुवारी रोजी सकाळी उलट्यांचा त्रास सुरू झाला व नंतर त्यांचा मृत्यू झाला. प्रकरणाची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, परिसरात राहणारे तीन अन्य लोक काशीनाथ रावते, दिनेश जाधव आणि रविंद्र रावते यांनीही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याच पद्धतीने त्यांच्याही पाळीव कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. त्याच दिवशी एका भटक्या कुत्र्याचाही मृत्यू झाला होता. 

गणेशपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी सांगितले की, दोन लैब्राडोर जाती आणि एक जर्मन शेफर्ड जातीचे श्वान होते. एकूण सहा कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे की, कोणीतरी कुत्र्यांना विष देऊन मारले आहे. पोलिसांनी २२ फेब्रुवारी रोजी संबंधित कलमांच्या आधारे गुन्हा नोंद केला आहे. अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

WhatsApp channel

विभाग