Women Docter Suicide In Mumbai: दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या अटल सेतू या सर्वात लांब सागरी पुलावरून एका महिला डॉक्टरने अरबी समुद्रात उडी मारली. या महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. परंतु, अद्याप पोलिसांना तिचा मृतदेह सापडलेला नाही. परंतु, पोलिसांना महिलेले मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट मिळाली, ज्यात तिने आत्महत्यामागचे कारण सांगितले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सेतू पुलावरून समुद्रात उडी मारलेली महिला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील रहिवाशी आहे. दरम्यान, १८ मार्च २०२४ रोजी महिला टॅक्सीतून प्रवास करीत होती. टॅक्सी अटल सेतूजवळ पोहोचली, तेव्हा तिने ड्रायव्हरला टॅक्सी थांबवायला सांगितली. त्यानंतर तिने टॅक्सीमधून उतरून पुलावरून थेट समुद्रात उडी मारली. टॅक्सीचालकाने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.
मुंबईतील न्हावाशेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी घडली. मात्र, अद्यापही महिलेचा मृतदेह सापडलेला नाही. दरम्यान, भोईवाडा पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तिच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. वडिलांना राहत्या घरातून एक सुसाईड नोट सापडली, ज्यात तिने असे लिहिले आहे की, मी गेल्या आठ वर्षांपासून डिप्रेशनमध्ये आहे आणि मी अटल सेतूवरून उडी मारून माझे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. तसेच तिला घटनास्थळी घेऊन जाणाऱ्या टॅक्सी चालकालाही जबाबदार धरू नये", असेही सुसाईड नोटमध्ये
अटल सेतूला अधिकृतपणे अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू म्हणून ओळखले जाते. याला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) असेही म्हटले जाते आणि या वर्षी जानेवारीमध्ये या पुलाचे उद्घाटन झाले.