मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् तुकोबारायांच्या पालखीचं पुण्यनगरीत आगमन, टाळ - मृदंगाचा गजर अन् हरिनामाचा जयघोष

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् तुकोबारायांच्या पालखीचं पुण्यनगरीत आगमन, टाळ - मृदंगाचा गजर अन् हरिनामाचा जयघोष

Jul 01, 2024 12:02 AM IST

dnyaneshwar maharaj Palkhi : वारकऱ्यांच्या मोठ्या गर्दीचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला असला तरी दरवर्षी देहू आणि आळंदी ते पंढरपूर पायी चालत पंढरपूरला जाण्याची शतकानुशतके जुनी परंपरा लक्षात घेऊन पुणेकरांनी ही गैरसोय सहन करणे पसंत केले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् तुकोबारायांच्या पालखीचं पुण्यनगरीत आगमन. (MAHENDRA KOLHE/HT PHOTO)
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् तुकोबारायांच्या पालखीचं पुण्यनगरीत आगमन. (MAHENDRA KOLHE/HT PHOTO)

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पुण्यात आगमन झाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचं कालच आळंदीहून प्रस्थान झालं होतं. तर तुकोबारायांच्या पालखीचं शुक्रवारी प्रस्थान झालं होतं. लाखो वारकऱ्यांरी पायी वारीतून पुण्यात दाखल झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी माऊलींच्या पालखी सोहळयात सहभागी झाले आहेत. पुणेकर आतुरतेने वाट पाहत असताना आज सायंकाळी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले.

ट्रेंडिंग न्यूज

रविवारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मिरवणुकीच्या आगमनाने शहर वारकऱ्यांच्या समुद्रात रुपांतरित झाले. हजारो वारकरी श्लोकांचा जयघोष आणि भजन गात शहरात दाखल झाले आणि वातावरणात ऊर्जा आणि उत्साह संचारला.

वारकऱ्यांच्या मोठ्या गर्दीचा शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी दरवर्षी देहू आणि आळंदी ते पंढरपूर पायी चालत जाण्याची शतकानुशतके जुनी परंपरा असल्याने पुणेकरांनी ही गैरसोय सहन करणे पसंत केले.

महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी नागरिकांच्या वतीने दोन्ही पालख्यांचे स्वागत केले. एरवी पुण्याचे महापौर पालखी मिरवणुकीचे स्वागत करायचे, पण गेल्या काही काळापासून पुणे महापालिकेत एकही निवडून आलेला सदस्य नसल्याने आयुक्त भोसले यांनी पालखी मिरवणुकीचे स्वागत केले.

या मिरवणुकीत नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. अनेक पुणेकरांनी वारकऱ्यांसोबत आळंदी ते पुणे असा पायी प्रवास करणे पसंत केले. पालखी मिरवणुका रविवार आणि सोमवार अशा दोन रात्री शहरात थांबून मंगळवारी पहाटे पुढील ठिकाणी रवाना होतील.

दरम्यान, वारकऱ्यांना भोजन, वैद्यकीय तपासणी, जनजागृती कार्यक्रम अशा विविध मोफत सेवा शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. फिरती सार्वजनिक स्वच्छतागृहे, जादा पाणीपुरवठा आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन यासाठी प्रशासनाने आवश्यक ती व्यवस्था केली आहे. ठिकठिकाणी आरोग्य सुविधाही उभारण्यात आल्या आहेत. पुण्याहून दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने जाणार आहेत. संत ज्ञानेश्वर पालखी सोलापूर महामार्गाकडे तर संत तुकाराम पालखी दिवे घाटमार्गे सासवडच्या दिशेने जाणार आहे.

WhatsApp channel