Pune Kasaba Murder : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कसबा पेठेत गुरुवारी रात्री एकाने पहिल्या पत्नीने घटस्फोट घेऊन दुसऱ्याशी लग्न केल्याने संतापलेल्या पहिल्या पतीने कसबा पेठेतील पवळे चौकात पत्नीच्या पहिल्या पतीला घरात घुसून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करून खून केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना दुपारी २ च्या सुमारास घडली.
सुमीत पटेकर (रा.पवळे चौक कसबा पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, त्याची पत्नी प्राजक्ता सुमीत पटेकर (वय ३४, रा. कसबा पेठ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी सनी राजेंद्र मारटकर (रा.गवळी वाडा, खडकी बाजार) व त्याच्या साथीदारांवर खून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमीत पटेकर व त्याची पत्नी प्राजक्ता या पवळे चौकातील अग्रवाल प्राईड सोसायटीत राहायला आहेत. प्राजक्ता यांनी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर त्यांनी सुमितशी लग्न केले होते. या घटनेमुळे आरोपी सनी याच्या डोक्यात राग होता. त्यामुळे सनीने याचा बदला घेण्याचे ठरवले. सनीने त्याच्या साथीदारासह कट सचून गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास सुमितच्या घरात शिरला. यावेळी प्राजक्ता, तिची सासू व पती सुमीत गप्पा मारत होते. यावेळी सनी व त्याच्या साथीदाराने सुमीवर कोयत्याने वार केले. यावेळी प्राजक्ताने सुमीतला वाचविण्यासाठी धावली. मात्र, सनीने तिच्यावर देखील कोयत्याने वार केले. यात प्राजक्ता देखील गंभीर जखमी झाली. तर पती सुमीत याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसाना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त रंगनाथ उंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी देखील घटनास्थळी येत आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या पथकाने उशीरा दोन आरोपींना अटक केली. आरोपी सनी याचे वडील राजा मारटकर देखील गुंड असून खडकी बाजारात परिसरात त्यांनी अनेक गुन्हे केले होते. टोळी युद्धातून मारटकर याचा तंबी गोस व त्याच्या साथीदारांनी खून केला होता.
संबंधित बातम्या