मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik news: नाशिकच्या पंचवटी परिसरात आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटणाऱ्याला अटक; कठोर कारवाईसाठी स्थानिकांचे आंदोलन

Nashik news: नाशिकच्या पंचवटी परिसरात आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटणाऱ्याला अटक; कठोर कारवाईसाठी स्थानिकांचे आंदोलन

Jun 23, 2024 01:45 PM IST

Nashik news : नाशिक येथे पंचवटी परिसरात एका समाज कंठकाने दोन समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने आक्षेपार्ह पत्रके वाटले. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, नागरिकांनी आंदोलन सुरूच ठेवत कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

नाशिकच्या पंचवटी परिसरात आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटणाऱ्याला अटक; कठोर कारवाईसाठी स्थानिकांचे आंदोलन
नाशिकच्या पंचवटी परिसरात आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटणाऱ्याला अटक; कठोर कारवाईसाठी स्थानिकांचे आंदोलन

Nashik news : नाशिक येथे पंचवटी परिसरात दोन समाजात तेढ निर्माण होईल असे पत्रके वाटणात आल्याने तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला तातडीने अटक केली आहे. तसेच नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र, ही पत्रके पाहिल्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून आंदोनल सुरू केले आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यावर त्यांच्या या कारवाईचे अभिनंदन त्यांनी केले आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

नाशिकच्या पंचवटी येथील राजवाडा परिसरात हिंदू युवा वहिनीच्या लेटर हेडवर एका समाजाविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर प्रिंट करून पत्रके वाटल्याचा प्रकार शनिवारी घडला होता. या नंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झळ होता. तब्बल शंभर ते दीडशे नागरिकांनी पंचवटी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते.

दरम्यान, पोलिसांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई करत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच नागरिकांना शांततेचे आवाहन देखील केले. दरम्यान, गैर प्रकार टाळण्यासाठी व येथे तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाटण्यात आलेल्या पत्रकावर हिंदू युवा वाहिनीच्या शहराध्यक्षाचे देखील नाव आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना देखील ताब्यात घेतले आहे.

या घटनेची दाखल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील घेत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतल्यावर त्यांनी केलेल्या कारवाईचे स्वागत एक्सवर पोस्ट करत आव्हाड यांनी केले आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागरिकांना शांतततेचे आव्हान केले आहे. तसेच या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देखील त्यांनी देखील दिले. सध्या पंचवटी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फडणवीस म्हणाले, पोलिसांनी या  प्रकरणाचा उलगडा केला आहे. काळाराम मंदिराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना धमकीचे  पत्र प्रकाशित करण्यात आले होते.  ज्याने ते प्रकाशित केले होते,  त्याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. आरोपीचे  एका व्यक्तीशी जुने वैमनस्य असल्याने त्याने  दलित समाजाला धमकी देणारा, निळे झेंडे लावू नका असा मजकूर असलेले  पत्रक काढले होते. काही राजकीय नेत्यांनी काल ते पत्र ट्विट केलंय. माझी त्यांना विनंती आहे, शहानिशा न करता, वस्तूस्थिती न तपासता समाज माध्यमावर पोस्ट केली तर समाजात तेढ निर्माण होईल. कालच्या प्रकरणात सर्व सत्य पुढे आले आहे. तसेच दोषीवर कारवाई करण्यात येईल असे देखील फडणवीस म्हणाले. 

WhatsApp channel
विभाग