Disha Patani Birthday: करोडोंमध्ये खेळते दिशा पाटनी; जाणून घ्या किती आहे संपत्ती
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Disha Patani Birthday: करोडोंमध्ये खेळते दिशा पाटनी; जाणून घ्या किती आहे संपत्ती

Disha Patani Birthday: करोडोंमध्ये खेळते दिशा पाटनी; जाणून घ्या किती आहे संपत्ती

Updated Jun 13, 2022 01:27 PM IST

बॉलीवूडची फिट आणि सेक्सी अभीनेत्री म्हणून ओळख असणा-या दिशा पाटनीची आज एका उंचीवर पोहचली आहे. दिशा विषयी तुम्हाला आज आम्ही काही खास माहिती देत आहोत.

<p>दिशा पाटनी</p>
<p>दिशा पाटनी</p>

Disha Patani Birthday: बॉलीवूड अभीनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) हीने स्वत: च्या हिमतीवर आज चित्रपट क्षेत्रात नवी ओळख बनवली आहे. अनेक चित्रपटात दमदान अभिनयाच्या जोरावर प्रसिद्ध झालेल्या दिशानं आज ३० वर्षांत पदार्पण केले आहे. ती आपला वाढदिवसा साजरा करत आहे. दिशा पाटनी उत्तर प्रदेशातील बरेली येथील मुळ रहिवाशी आहे. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मुंबईत आली होती. पण तुम्हाला माहिती आहे का दिशा ही मुंबईत अभिनेत्री बनण्यासाठी नव्हती आली. दिशाला पायलट व्हायचं होत. यासाठी तिनं मुंबई गाठली होती. पण यानंतर असे काही झाले की ती अभिनयाच्या क्षेत्राकडे वळाली. तीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला आज तिच्याशी निगडीत काही खास गोष्टी सांगणार आहोत.

केवळ ५०० रुपये घेऊन मुंबईत आली होती दिशा

दिशा पाटनीचे वडील हे एक पोलिस आॅफिस आहेत. तीची एक बहिण ही लष्करात आले. अशातच दिशाने सुद्धा आपण पायलट व्हाव अस स्वप्त उराशी बाळगलं होत. दिशानं लखनऊ विद्यापीठात बायोटेकचे शिक्षण घेत असतांना मॉडेलिंगपण सुरू केले होते. दिशा हीनं फक्त ५०० रुपये सोबत घेऊन ती मुंबईला आली होती. त्यानंतर मुंबईत दिशा ने एका कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला आणि यानंतर तिला आॅडिशन देण्यासाठी फोन यायला लागले. यानंतर काय ? दिशानं फिल्मलाईन निवडत अभिनेत्री बनण्याचा मार्ग निवडला. दिशा पाटनीने चित्रपट एमएस धोनी : द अनटोल्ट स्टोरी या चित्रपटात डेब्यू केला होता.

आज कोट्यवधींची मालकिन आहे दिशा

caknowledge.com च्या रिपोर्ट नुसार, दिशा पाटनी आज कोट्यवधी रुपयांची मालकिन आहे. दिशा वर्षांला १२ कोटी रुपयांची कमाई करते. तीचे एका महिन्याचे उत्पन्न हे १ कोटी रुपये एवढे आहे. दिशा पाटनीची एकुण संपत्ती ही ७४ कोटी रुपये एवढी आहे. दिशा एका चित्रपटात काम करण्यासाठी जवळपास ६ कोटी रुपयांचे मानधन घेते. तर ब्रांड एंडोर्समेंट्सचे ती १ कोटी रुपये घेते.

दिशा पाटनीचं घर आहे आलीशान

दिशा पाटनीने मुंबईत एक आलीशान घर खरेदी केले आहे. ज्यात विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. तीच्या घराची किंमत जवळपास ५कोटी रुपये एवढी आहे. दिशा तीच्या घराचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. कधी एक्ट्रेस बालकनी तर कधी घरातील जिम वर्कआऊट करतांना ती फोटो शेअर करते.

महागड्या गाड्यांचीही दिशाला आहे आवड

दिशा पाटनीला महागड्या आणि आरामदायी गाड्यांची आवड आहे. तिच्या कडे मिनी कॉपर, मर्सडिज बेंन्झ, आॅडी या सारख्या अनेक लझ्सरी गाड्य आहेत. ती नेहमी मर्सिडिज आणि आॅडी या गाड्या वापरते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर