Girish Mahajan viral video : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत ग्रामविकास मंत्र्यांच्या जामनेर मतदार संघातील रस्त्यांची दुसरवस्था दिसून येत आहेत. या निकृष्ट रस्त्यांबाबत गावातील तरुण त्यांना जाब विचारतांना दिसत आहेत. मात्र, गिरीश महाजन त्यांना उत्तर न देता दुचाकीवर बसून याच चिखल असलेल्या खराब रस्त्यातून जात असतांना दिसत आहेत. या घटनेवरून गावातील तरुणांनी व नागरिकांनी मंत्र्यांच्या या वागणुकीवर रोष व्यक्त केला आहे. तसेच खराब रस्त्यांबाबत देखील नाराजी व्यक्त केली आहे. येथील रस्त्यांबाबत ठोस भूमिका घेऊन निर्णय घेणे अपेक्षित असतांना ग्रामविकास मंत्री मात्र, दुचकीवर बसून निघून गेले असे तरुणांनी म्हटलं आहे. महाजन यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
मंत्री गिरीश महाजन ही जामनेर मतदारसंघातील लिहा तांडा गावात दौऱ्यावर गेले होते. या गावात पोहोचल्यानंतर त्यांचे स्वागत खराब रस्त्यांनी झाले. रस्त्यावर मोठा चिखल साचला असून नुसती माती व घाण पाणी रस्त्यावर दिसत आहेत. दरम्यान, गावातील रस्त्यांच्या वाईट अवस्थेबद्दल गावातील काही तरुण गिरीश महाजन यांना जाब विचारतांना दिसत आहे. मात्र, महाजन यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तर न देता कार्यकर्त्यांच्या दुचाकीवर बसून याच चिखल युक्त रस्त्याने जातांना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. तर काही तरुण गिरीश महाजणांना हाका मारून त्यांच्या मागे धावतांना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.
हा विडिओ अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया वॉलवर पोस्ट केला आहे. यात त्यांनी त्यांना खराब रस्त्यावरून जाब विचारला आहे. जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन गेले असता गेल्या ३० वर्षापासून गावात रस्त्यांची दुरवस्था का असा सवाल तरुणांनी विचारला. आम्ही तुम्हाला निवडून देता आणि तरीसुद्धा रस्ते खराब का? असा प्रश्न तरुणांनी विचारला असता, महाजन यांनी तेथून पळ काढला असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोस्ट मध्ये लिहिले आहे.
व्हायरल व्हिडिओवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदार संघात पाऊस झाल्याने रस्त्यावर चिखल झाला होता असे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. येथील समस्या जाणून घेण्यासाठी गावात गेलो होतो. मात्र,यावेळी दुचाकीवरून जात असतांना काही तरुणांनी व्हिडिओ काढला.