पुरोगामी राज्याला लाजवणारी घटना! पुण्यात दिग्गज आयटी कंपनीच्या संचालकाला सोसायटीने बहिष्कृत केले; १३ जणांवर गुन्हा-director of big it company was made a social outcast by society member in pune audh area supriya society ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुरोगामी राज्याला लाजवणारी घटना! पुण्यात दिग्गज आयटी कंपनीच्या संचालकाला सोसायटीने बहिष्कृत केले; १३ जणांवर गुन्हा

पुरोगामी राज्याला लाजवणारी घटना! पुण्यात दिग्गज आयटी कंपनीच्या संचालकाला सोसायटीने बहिष्कृत केले; १३ जणांवर गुन्हा

Sep 09, 2024 03:34 PM IST

Pune family social outcast by society in Aundh : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका जगप्रसिद्ध आयटी कंपनीच्या संचालकालाच सोसायटीने बहिष्कृत केल्याचं उघडं झालं आहे. या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात बड्या आयटी कंपनीच्या संचालकाला सोसायटीने केले बहिष्कृत; १३ जणांवर गुन्हा, पुरोगामी राज्याला लाजवणारी घटना
पुण्यात बड्या आयटी कंपनीच्या संचालकाला सोसायटीने केले बहिष्कृत; १३ जणांवर गुन्हा, पुरोगामी राज्याला लाजवणारी घटना

Pune family social outcast by society in Aundh : पुणे हे शिक्षणाचे माहेरघर समजलं जातं. या ठिकाणी अनेक बुद्धिवान, विचारी, विवेकी नागरिक राहतात अशी पुण्याची ख्याती आहे. तसेच पुरोगामी अशी देखील पुण्याची ओळख आहे. मात्र, शहरासह संपूर्ण राज्याला लाजवेल अशी घटना पुण्यात उघडकीस आली आहे. औंध येथील एका बड्या सोसायटीत मोठ्या आयटी कंपनीच्या संचालकाला सोसायटीतील काही लोकांनी बहिष्कृत केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात सोसायटीतील १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नागरस रोडवरील सुप्रिया टॉवर्स येथे घडली. पीडित कुटुंब यांनी या प्रकरणी कोर्टात दाद मागीतली होती. त्यानुसार कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 

 रुपेश जुनवणे, दत्तात्रय साळुंखे, अश्विनी पंडित, सुनील पवार, जगन्नाथ मुरली, अश्विन लोकरे, अनिरुद्ध काळे, समीर मेहता, संजय गोरे, सोनाली साळुंखे, शिल्पा जुनवणे, अशोक खरात आणि वैजनाथ संत अशी या प्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुण्यात एका मोठ्या आयटी कंपनीच्या संचालका सोबत त्याच्याच सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी संतापजनक प्रकार केला आहे. आयटी कंपनीच्या या संचालकालाच सोसायटीने समाजातून बहिष्कृत केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित आयटी कंपनीच्या संचालकाचया घरासमोर लावलेल दिवे हे सोसायटीतील काही नागरिकांनी नारळ टाकून विझवले. तसेच सोसायटीत असलेल्या गणपती समोर अथर्वशीर्ष पठण करण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या पत्नीला देखील येण्यास प्रतिबंध करण्यात आला. तर त्यांच्या अल्पवयीन मुलीसोबत सोसायटीतील मुलांना खेळण्यासाठी देखील त्यांना बहिष्कृत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादीने सोसायटीचा हिशोब मागितल्याच्या कारणावरून त्यांना बहिष्कृत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कोर्टात केली होती याचिका दाखल

पीडित कुटुंबातील सदस्यांशी सोसायटीतील इतर सभासदांनी बोलणे बंद केले होते. त्यांच्याशी कुणी नीट बोलत नव्हते. तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय लिफ्टमध्ये दिसल्यास त्यांच्या कडे पाहून उलट सुलट बोलणे, तोंड वाकडे करणे तसेच तयांची चेष्टा करणे हे प्रकार केले जात होते. ऐवढेच नाही तर त्यांच्या घरावर नारळ फेकणे अशी अघोरी कृत्य देखील करण्यात आली. त्यामुळे या कंटाळलेल्या आयटी कंपनीच्या संचलकाणे थेट कोर्टात दाद मागितली होती. याची दखल न्यायालयाने घेऊन १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Whats_app_banner
विभाग