Diljit Dosanjhs Pune concert : पुण्यातील कोथरूड परिसरात अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ यांच्या दिल-लुमिनाती कॉन्सर्टमध्ये दारू विक्रीवरून मोठा वाद झाला होता. पुणेकरांनी व विविध सामाजिक संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता. तसेच मद्यपरवाना रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाचा दारू परवाना रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र, असे असतांना देखील या म्युझिक कॉन्सर्टला आलेले अनेक तरुण आणि तरुणींनी बाहेरून मद्य आणून रस्त्यावरच मद्यसेवन केले. या तरुणांना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडले आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
पुण्यातील कोथरूड परिसरात काकडे सिटीमध्ये अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ यांच्या दिल-लुमिनाती कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये मोठ्या प्रमाणात स्पीकर लावून तसेच दारू विक्री करून पुण्याचे संस्कृतीक वातावरण खराब केले जात असल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता. हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. हे प्रकरण, कोथरूडचे नवनिर्वाचित भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी देखील या कार्यक्रमात दारू विक्रीवर आक्षेप घेतला. त्यांनी राज्य उत्पादन कार्यालयाला आदेश देत कार्यक्रमाचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्यक्रमादरम्यान मद्यविक्रीची परवानगी रद्द केली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त सी. राजपूत यांनी दिली होती.
कोथरूड येथील काकडे फार्म येथे अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ यांच्या दिल-लुमिनाती कॉन्सर्ट हा काही अटी शर्तीवर रविवारी रात्री पार पडला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात तरुण आले होते. दारू परवाना रद्द केल्याने अनेक तरुण तरुणींनी बाहेरून मद्य आणले होते. त्यांनी रस्त्यावरच मद्यपान केले. काही सामाजिक संघटनांनी ही बाब उघडकिस आणली. यावेळी पोलिस देखील होते. त्यांच्या समोर हा प्रकार होत असल्याने त्यांनी कारवाई का केली जात नाही ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, मद्यपान करणाऱ्या तरुणींचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
पंजाबी म्युझिक सेन्सेशन दिलजीत दोसांझने त्याच्या कॉन्सर्टमध्ये दारू बंदीसाठी अट ठेवली होती. देशातील सर्व मद्यविक्री करणारे दुकाने बंद झाली त्यांचे ठेके रद्द केले तरच मी दारूवरील आधारित गाणी बंद करेन.
गुजरातमधील अहमदाबाद मध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर त्याला या प्रकरणी नोटिस देण्यात आली होती. हैदराबाद येथील कॉन्सर्टपूर्वी देखील दारू, ड्रग्ज आणि हिंसाचाराशी संबंधित गाणी गाणे टाळण्याचे निर्देश त्याला देण्यात आले दिले. 'दिल-लुमिनाती इंडिया टूर २०२४ टूर'च्या हैदराबाद कॉन्सर्टपूर्वी तेलंगणा सरकारकडून नोटीस मिळाल्यानंतर दिलजीतने 'लेमोनेड' आणि '५ तारा' या चार्टबस्टर गाण्यांमधील शब्दांमध्ये बदल केला. दरम्यान, नोटिशीवर त्याने टीका देखील केली होती.