Maharashtra election result : राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान झाले. तर २३ तारखेला मतमोजणी झाली. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. निकालाच्या आकडेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, तब्बल ९५ मतदार संघात मतदान केंद्रात झालेले मतदान आणि मतमोजणीत ईव्हीएम ईव्हीएममधून बाहेर आलेले आकडे यात मोठी तफावत असल्याचं आढळलं आहे. तफावत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ९५ मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबरला ईव्हीएममध्ये झालेले मतदान आणि २३ नोव्हेंबरला त्याच ईव्हीएममधून बाहेर आलेले प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक असल्याचे दिसते. दरम्यान, यावरून विरोधक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी लागले. या निवडणुकीत महायुतीने महाविकास घाडीचा सुपडा साफ केला. तब्ब. २३६ मतदार संघात महायुतीचे आमदार मोठ्या मतांनी निवडून आले. यात भाजपने तब्बल १३७ जागांवर यश मिळवलं आहे. निवडणूक निकाल हाती येताच संजय राऊत यांनी या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राज्यात विरोधी वातावरण असतांना देखील असे निकाल येणे धक्कादायक असल्याचं राऊत म्हणाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार ९५ मतदार संघात प्रत्यक्ष झालेले मतदान आणि ईव्हीएममधी मतदान यात तफावत असल्याचं आढळलं आहे. तर १९ मतदार संघात ईव्हीएममध्ये जास्तीची मते आढळली आहे. तर ७६ मतदार संघात ईव्हीएममध्ये कमी मतदान आढळले आहे. तर बुध पातळीवरील तपासणीत तफावत असल्याचं आढळलं आहे. तर १९३ मतदार संघात झालेले प्रत्यक्ष मतदान व ईव्हीएममधील आकडे यात कोणतीही तफावत आढळली नाही.
१. अक्कलकुवा
२. नवापूर
३. साक्री
४. शिरपूर
५. चोपडा
६. भुसावळ पश्चिम
७. जळगाव शहर
८. चाळीसगाव
९. पाचोरा
१०. जामनेर
११. अकोट
१२. अकोला
१३. मोर्शी
१४. वर्धा
१५. सावनेर
१६. नागपूर मध्य
१७. नागपूर
१८. कामठी
१९. आरमोरी
२०. अहेरी
२१. बल्लारपूर
२२. चिमूर
२३. वणी
२४. नांदेड दक्षिण
२५. मुखेड
२६. कळमनुरी
२७. जिंतूर
२८. गंगाखेड
२९. पाथरी
३०. घनसावंगी
३१. बदनापूर
३२. औरंगाबाद
३३. गाणगापूर
३४. नांदगाव
३५. मालेगाव
३६. बागलाण
३७. सिन्नर पश्चिम
३८. निफाड
३९. नालासोपारा
४०. वसई
४१. भिवंडी
४२. कल्याण
४३. अंबरनाथ
४४. कल्याण पूर्व
४५. कल्याण ग्रामीण
४६. मीरा भाईंदर
४७. ओवळा
४८. कोपरी
४९. दिडोशी
५०. चारकोप
५१. विलेपार्ले
५२. चांदीवली
५३. सायन कोळीवाडा
५४. मुंबादेवी
५५. पनवेल
५६. कर्जत
५७. अलिबाग
५८. आंबेगाव
५९. शिरूर
६०. इंदापूर
६१. बारामती
६२. मावळ
६३. कोथरूड
६४. खडकवासला
६५. पुणे कॅन्टोन्मेंट
६६. कोपरगाव
६७. शेवगाव
६८. लातूर ग्रामीण
६९. लातूर शहर
७०. अहमदपूर
७१. आँसा
७२. तुळजापूर
७३. माढा
७४. सोलापूर शहर मध्य
७५. कोल्हापूर उत्तर
७६. खानापूर
१. आमगाव
२. उमरखेड
३. लोहा
४. देगलूर
५. हिंगोली
६. औरंगाबाद पूर्व
७. वैजापूर
८. मालेगाव मध्य
९. कळवण
१०. चांदवड
११. दिंडोरी
१२. बोईसर
१३. भोसरी
१४. परळी
१५. करमाळा
१६. सोलापूर दक्षिण
१७. कागल
१८. कोल्हापूर
१९. हातकणंगले