Electronic Voting Machines vs Ballot Papers: मतदान हा प्रत्येक लोकशाही प्रक्रियेचा आधारस्तंभ आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींमध्ये बरेच बदल करण्यात आले. देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी मतपत्रिकेचा म्हणजेच बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भारतासह अनेक देशांत ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. दरम्यान, ईव्हीएम आणि बॅलेट पेपर यांच्यात नेमका फरक काय आहे? तसेच दोन्ही पद्धतींमधील फायदे आणि तोटे काय आहेत? हे जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात नुकतीच विधानसभेसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. महायुतीला एकूण २३३ जागांवर विजय मिळवता आला आहे. तर, महाविकास आघाडीने फक्त ५० जागा जिंकल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भाजपला १३२ जागेवर विजय मिळवता आहे. तर, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे आणि अजित पवार गटाला अनुक्रमे ५७ आणि ४१ जागेवर विजय मिळवता आला. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेला १६ जागा मिळाल्या. तर, ठाकरे गट आणि शरद पवार गटाला अनुक्रमे २० आणि १० जागा जिंकत्या आल्या.