गुटखावाल्यांकडून पैसे वसुलीप्रकरणी पार्थ पवारांना अडकवण्याचा प्लॅन, अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गुटखावाल्यांकडून पैसे वसुलीप्रकरणी पार्थ पवारांना अडकवण्याचा प्लॅन, अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

गुटखावाल्यांकडून पैसे वसुलीप्रकरणी पार्थ पवारांना अडकवण्याचा प्लॅन, अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

Oct 26, 2024 03:54 PM IST

Anil Deshmukh on Devendra Fadnavis: 'डायरी ऑफ होम मिनिस्टर' या पुस्तकातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप
अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप (HT_PRINT)

Anil Deshmukh News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपपल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. याच रणधुमाळीत राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी लिहिलेले 'डायरी ऑफ होम मिनिस्टर ' या पुस्तकामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.महाविकास आघाडी सरकार अडचणीत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारे प्लान रचला? हे या पुस्तकाच्या माध्यमातून सांगण्यात आले. एवढेच नव्हेतर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना गुटखावाल्यांकडून पैसे वसूली प्रकारणात अडकण्याचा फडणवीस यांचा प्लान होता, असेही आरोप या पुस्तकातून करण्यात आला.

'डायरी ऑफ होम मिनिस्टर ' या पुस्तकाच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून समीत कदम हा व्यक्ती माझ्याकडे एक प्रतिज्ञापत्र घेऊन आला. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आणि आमदार आदित्य ठाकरे, माजी मंत्री अनिल परब आणि पार्थ पवार यांना अडकवण्याचा डाव असल्याचाही यात उल्लेख करण्यात आला.

नुकतेच अनिल देशमुख यांनी आपल्या 'डायरी ऑफ होम मिनिस्टर' या पुस्तकातील चार पाने ट्विट केले. यात पार्थ पवार यांना गुटखावाल्यांकडून वसूली प्रकरणात कसे अडकवले जाणार होते? याबाबत सांगण्यात आले. अनिल देशमुख यांनी ट्वीट केलेल्या चार पैकी एका पानावरील परिच्छेदात असे लिहिण्यात आले की, 'मी गृहमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला मंत्रालयातील कार्यालयात बोलावून घेतले, तिथे त्यांचा मुलगा पार्थ पवारही होता. तिथे गेल्यानंतर अजित पवार यांनी मला राज्यात गुटखा- पानमसाल्याचा धंदा खूप मोठा आहे. त्यांच्याकडून आपल्याला पैसेवसुली करायची आहे. पार्थ पवार यांचे गुटखा मानमसाला इंन्डस्ट्रीतील घोडावतसारख्या लोकांशी संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याकून पैसे वसूलीचे कामे पार्थ पवार करतील, तुम्ही फक्त गृहमंत्री म्हणून त्यांना मदत करा', असे प्रतिज्ञापत्रात मला खोटे लिहायला सांगितले.

संबंधित प्रतिज्ञापत्रावर सही न केल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी ईडी आणि सीबीआयच्या मार्फत आपल्यावर कारवाई घडवून आणण्याचा देखील पुस्तकातून उल्लेख करण्यात आला आहे. माझ्या नागपूरचे घर, मुंबईचे घर, कार्यालयावर सीबीआयने छापे टाकले, हे छापे मला घाबरवण्यासाठी होते, 'गुड कॅम्प बॅड कॉप' थेअरीप्रमाणे मला अडकवले जाईल, ही माझी शंका निराधार नव्हती, असेही अनिल देशमुख यांनी पुस्तकातून म्हटले आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर