Dhule Accident : धुळ्यात सोमवारी रात्री ८ च्या सुमारास ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. कर्नाटक येथून सुपारी घेऊन गुजरात येथे जात असलेल्या भरधाव ट्रकने एका कारला पाठीमागून धडक दिली. तसेच दोन दुचाकींनाही ठोकरले. या अपघातात मुंबईत एका वृत्त वाहिनीत काम करत असणाऱ्या पत्रकाराचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत. ही घटना धुळ्यातील गरताडबारीजवळ घडली.
हर्षल भदाणे (वय २७) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुण पत्रकाराचे नाव आहे. तर ट्रक चालक दीपक डोडवे (वय ४०) आणि सहचालक उमेश मनडेला असे आरोपींची नावे आहेत. दोघांनीही दारू प्यायली होती.
मिळलेल्या माहितीनुसार हर्षल भदाणे हा मुंबईत टी. व्ही. चॅनलमध्ये रिपोर्टरचे काम करीत होता. ट्रकने कारला धडक दिल्यावर कारमधील हर्षलने बाहेर उडी मारली व याच ट्रकच्या ट्रकच्या पुढच्या चाकाखाली येऊन चिरडला गेल्याने हर्षलचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता भरधाव वेगात पुढे धुळे शहराच्या दिशेने निघून गेला. यएलि त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन मोटारसायकल स्वारांना धडक दिली. धुळ्यातील मनोहर चित्रपट गृहाजवळ आल्यावर ट्रक हा त्याठिकाणी सुरु असलेल्या बांधकामाच्या साहित्याला धडकल्याने जागीच थांबला. यावेळी स्थानिक नागरिकांनी पळून जाणाऱ्या ट्रकचालकाला व त्याच्या सहचालकाला पकडले. यावेळी जमावाने दोघांनाही मारहाण करत पोलिसांच्या हवाली केले. तसेच काही संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगड फेक करत त्याची तोडफोड केली. ट्रक चालक व सहचालकाने दारू प्यायली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
कर्नाटक येथून मध्यप्रदेशात इंदूर येथे सुपारी घेऊन ट्रक चालक दीपक डोडवे (वय ४०) व सहचालक उमेश मनडेला (वय २५) जात होते. या दोघांनी वाटेत मद्यपान केले होते. दारूच्या नशेत असणाऱ्या चालकाने ट्रक वेगाने दामटला. हा ट्रक गरताडबारीजवळ आला असता त्याने एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. अचानक धडक बसल्याने कारमध्ये बसला असलेल्या हर्षल भदाणे याने गाडीतून बाहेर उडी मारली. यावेळी तो ट्रकच्या ट्रकच्या पुढच्या चाकाखाली आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दारूच्या नशेत ट्रकचालकाने ट्रक भरधाव वेगात पुढे नेला. धुळे शहरात शिरल्यावर आणखी काही वाहतांना, त्याने धडक दिली. या घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी मनोहर टॉकीजजवळ जावून ट्रक ताब्यात घेत दोघांना अटक केली. यावेळी जमाव संतप्त झाल्याने त्यांनी दगड फेक केली. यात एक पोलिस जखमी झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
संबंधित बातम्या