Dhule Accident News: धुळ्यात पिकअप व्हॅन आणि ईको कार यांच्यात रविवारी भीषण अपघात घडला. या अपघातात पाच जणांच मृत्यू झाला आहे. तर, चार जण गंभीर जखमी झाले हेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाटा येथे हा अपघात घडला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातल्या दसवेल फाट्यावर पिकअप व्हॅन आणि ईको कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. दरम्यान, पिकअप वाहनाचा चालक मद्यधुंत अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातामुळे धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
छत्रपती संभाजी नगर महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने कारला धडक दिली. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. दरम्यान, वाळूज पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली. मृणाली अजय देऊस्कर (वय ३६ वर्षे), आशालता हरिहर पोळघाट (६४ वर्षे), अमोघ देऊस्कर (६ महिने) आणि दुर्गा सागर गीते (७ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. अमरावती येथे बेबी शॉवरचा कार्यक्रम आटोपून पुण्याकडे परतत असताना भरधाव वेगात आलेल्या स्कॉर्पिओने त्यांच्या कारला धडक दिली. दरम्यान, स्कॉर्पिओतून प्रवास करणाऱ्या विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय,२२) आणि कृष्णा कारभारी केरे (वय, १९) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे लोक गंगापूरहून संभाजीनगरकडे जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर आदळली आणि समोरून येणाऱ्या कारला धडकली. ज्यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.