Dhule Accident: धुळ्यात भरधाव ट्रकच्या धडकेत १८ वर्षीय दुचाकीस्वारचा मृत्यू; एलएम सरदार हायस्कूल परिसरातील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhule Accident: धुळ्यात भरधाव ट्रकच्या धडकेत १८ वर्षीय दुचाकीस्वारचा मृत्यू; एलएम सरदार हायस्कूल परिसरातील घटना

Dhule Accident: धुळ्यात भरधाव ट्रकच्या धडकेत १८ वर्षीय दुचाकीस्वारचा मृत्यू; एलएम सरदार हायस्कूल परिसरातील घटना

May 26, 2024 07:01 PM IST

Bike and Truck Collision In Dhule: धुळ्यातील एलएम सरदार हायस्कूल परिसरात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला.

धुळ्यात भरधाव ट्रकच्या धडकेत १८ वर्षीय दुचाकीस्वारचा मृत्यू झाला आहे.
धुळ्यात भरधाव ट्रकच्या धडकेत १८ वर्षीय दुचाकीस्वारचा मृत्यू झाला आहे.

Dhule Accident News: महाराष्ट्राच्या विविध भागात गेल्या आठ दिवसांत अपघाताच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत, ज्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पुणे पोर्शे कार अपघाताची चर्चा सुरू असताना धुळ्यात भरधाव ट्रकच्या धडकेत १८ वर्षाच्या दुचाकीस्वारचा मृत्यू झाला. धुळे शहरातील एलएम सरदार हायस्कूल परिसरात आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणातील ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल योगेश सूर्यवंशी (वय, १८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल हा आज दुपारी आपल्या दुचाकीने दत्त मंदिर चौकातून घरी जात असताना भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यानंतर राहुल खाली पडल्याने तो ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. या घटनेत राहुलचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी पंचवटी परिसरात ट्रक अडवून चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुलच्या वडिलांचे विश्वकर्मा गॅरेज नावाचे शहरात प्रसिद्ध दुकान आहे. धुळ्यातील या अपघातामध्ये राहुलचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धुळे शहरात सकाळी ०८.०० ते रात्री ०८.०० वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र, असे असताना ट्रक चालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. दुपारच्या सुमारास अवजड वाहने बिंधास्तपणे प्रवास करतात. यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

नाशिक: डंपर विहिरीत कोसळल्याने चालकाचा मृत्यू

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील निमोण गावात शेत जमीन लेव्हलिंगचे काम सुरू असताना डंपर विहिरीत कोसळल्याने चालकाचा मृत्यू झाला आहे. अक्षय सुभाष दळवी असे मयत चालकाचे नाव आहे. अक्षय नांदगाव तालुक्यातील चींचविहिर या गावातील रहिवासी असून घटनास्थळी डंपरमध्ये माती आणून ती शेतात टाकण्याचे काम करीत होता. मात्र, शेतातील विहिरीचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. कुटुंबातील तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने दळवी कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर