मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dharavi: धारावीतील रहिवाशांना घरांचा मालकी हक्क मिळणार नाही; काँग्रेसचा आरोप

Dharavi: धारावीतील रहिवाशांना घरांचा मालकी हक्क मिळणार नाही; काँग्रेसचा आरोप

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 25, 2024 08:00 AM IST

Mumbai Congress: धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी रेल्वेच्या जागेच्या समस्येमुळे धारावीवासीयांना अदानी रियल्टीच्या पुनर्विकासातील घरांची पूर्ण मालकी मिळणार नसल्याचा आरोप केला आहे.

Dharavi, one of Asia's largest slums, in Mumbai.
Dharavi, one of Asia's largest slums, in Mumbai. (HT_PRINT)

Varsha Gaikwad Allegation: अदानी रियल्टीने आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी वसाहतीचा पुनर्विकास केल्यास धारावीवासीयांना त्यांच्या घरांची पूर्ण मालकी मिळणार नाही, कारण जमिनीचा बराचसा भाग रेल्वेच्या मालकीचा आहे, असा आरोप धारावीच्या आमदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी शनिवारी केला.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण म्हणजेच आरएलडीएने धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २० फेब्रुवारी रोजी पत्र लिहून स्पष्ट केले की, अदानी यांच्या नेतृत्वाखालील धारावी एसपीव्ही प्रकल्पासाठी वापरली जाणारी ४७.५ एकर रेल्वे जमीन शेवटच्या वापरकर्त्यांना भाडेतत्त्वावर देऊ शकत नाही. म्हणजे रेल्वेच्या जागेवर बांधलेल्या पुनर्वसन इमारतींना कधीही निरपेक्ष आणि विक्रीयोग्य मालकी मिळणार नाही. म्हणजेच धारावीकरांना या जागेवर पुनर्वसन सदनिका देण्यात आल्या आहेत, त्यांना त्यांच्या फ्लॅटचा पूर्ण मालकी हक्क कधीच मिळणार नाही, असे गायकवाड यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

माटुंग्याच्या रेल्वे क्वार्टरमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांना अधिसूचित क्षेत्रात स्थलांतरित करण्यावरून आरएलडीए आणि धारावी एसपीव्ही यांच्यात वाद सुरू आहे. धारावीतील मोदानी पुनर्विकास महाघोटाळा धारावीकरांच्या हक्कांवर गदा आणत आहे, हे आम्ही वारंवार अधोरेखित केले आहे. या चुकीच्या प्रकल्पामुळे धारावीत राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या ७ लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर कसे होईल, हे आम्ही यापूर्वीच उघड केले आहे. धारावी अधिसूचित क्षेत्रातील पुनर्वसनासाठी 'पात्र' असलेल्यांनाही त्यांच्या पुनर्वसन सदनिकांवर पूर्ण मालकी हक्क मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

धारावीच्या पुनर्विकासाचे कंत्राट अदानी रियल्टीला मिळाले आहे, तर काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा या प्रकल्पाला विरोध आहे. धारावीतील एकाही व्यक्तीला विस्थापित होऊ देणार नाही. रेल्वेच्या जागेवर पुनर्वसन घटक बांधू नये. रेल्वे क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या कुटुंबांचा कायमस्वरुपी पुनर्वसन आराखडा अंतिम होऊन त्याला मंजुरी मिळेपर्यंत त्यांचे स्थलांतर करू नये. अदानी रियल्टीच्या प्रवक्त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.

IPL_Entry_Point