मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पोलीस व्हायचं स्वप्न राहिलं अधुरं..! भरतीचा सराव करून गोळा डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू

पोलीस व्हायचं स्वप्न राहिलं अधुरं..! भरतीचा सराव करून गोळा डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू

May 30, 2024 11:35 PM IST

Dharashiv News : खाकी वर्दीचं स्वप्न उराशी बागळून तयारी करणाऱ्या तरुणासोबत धक्कादायक घटना घडून त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना धाराशिवमध्ये घडली.

पोलीस भरतीचा सराव करून गोळा डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू
पोलीस भरतीचा सराव करून गोळा डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू

पोलीस भरती होऊन खाकी वर्दी अंगावर चढवून देशसेवा करण्याचे अनेक तरुणांचं स्वप्न असते. मात्र भरतीची तयारी करताना ह्दयविकाराच्या धक्क्याने तर कधी अपघाताने अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही मनाला चटका लावून जातात. आपले स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या तरुणाईवर अशा घटनांनी आघात होता. अशीच एक घटना धाराशीवमध्ये समोर आली आहे. खाकी वर्दीचं स्वप्न उराशी बागळून तयारी करणाऱ्या तरुणासोबत धक्कादायक घटना घडून त्याचा मृत्यू झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

धाराशिवमध्ये पोलीस भरतीचा सराव करताना तरुणाच्या डोक्यात लोखंडी गोळा पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुस्तकीम जावेद काझी (वय २१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुस्तकीम आपल्या मित्रासोबत बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुलात पोलीस भरतीसाठी गोळाफेकीचा सराव करीत होता. दोघे मित्र सराव करताना फेकलेला गोळा मार्कींग करत होते. एका गोळाफेकीनंतर मार्किंग करणाऱ्या मित्राच्या डोक्यात लागून तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपस्थित डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

मुस्तकीम काझी हा तरुण धाराशिव शहरातील दर्गाह परिसरातील गाझीपुरा भागात रहात होता. तो व त्याचा मित्र गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करत होते. हे दोघे गोळाफेक तसेच धावण्याचा सराव करण्यासाठी नियमितपणे तुळजाभवानी क्रीडा संकुलात येत होते. बुधवारी रात्रीही नेहमीप्रमाणे ते सराव करत होते. एकजण गोळा फेकण्याचा सराव करीत असताना दुसरा गोळा किती लांब गेला त्याची मार्कींग करत होता. आलटून-पालटून त्यांचा सराव सुरू होता. गोळाफेक केल्यानंतर मुस्तकीम जावेद काझी मार्कींगसाठी पुढे गेला. याचवेळी मित्राने गोळा फेकला अन् तो बरोबर काझी याच्या डोक्यात लागला.

लोखंडी गोळ्याचा डोक्यात जबर मार लागल्याने मुस्तकीम जमिनीवर कोसळला. जखमी अवस्थेत त्याला मित्राने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग