Dharashiv : जन्मदात्याची हत्या करून मृतदेह नदीत फेकला, धाराशीवमधील संतापजनक घटना-dharashiv crime news son killed his father and threw his body in river ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dharashiv : जन्मदात्याची हत्या करून मृतदेह नदीत फेकला, धाराशीवमधील संतापजनक घटना

Dharashiv : जन्मदात्याची हत्या करून मृतदेह नदीत फेकला, धाराशीवमधील संतापजनक घटना

Aug 11, 2024 08:40 PM IST

Dharashiv Crime News : दोघांमध्ये वादावादी झाल्यानंतर विजयने संतापाच्या भरात वडिलांवर हल्ला करत त्यांना संपवलं. वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी विजयने आपला गुन्हा लपवण्यासाठी वडिलांचा मृतदेह नदीत फेकून दिला.

जन्मदात्याची हत्या करून  मृतदेह नदीत फेकला
जन्मदात्याची हत्या करून  मृतदेह नदीत फेकला

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धाराशिवमध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना भूम तालुक्यातील आंतरगाव येथे घडली आहे. या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झालं आहे.

विजय उर्फ बोधीराम विक्रम गोरे, असं आरोपीचे नाव आहे. परंडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपाला अटक केली आहे. आरोपीने वडिलांची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. 

दोघांमध्ये वादावादी झाल्यानंतर विजयने संतापाच्या भरात वडिलांवर हल्ला करत त्यांना संपवलं. वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी विजयने आपला गुन्हा लपवण्यासाठी वडिलांचा मृतदेह नदीत फेकून दिला. दोन दिवसानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी विजयला अटक केली असून हत्येच्या कारणाचा तपास केला जात आहे.

पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली तेव्हा त्याच्या हातात लोखंडी शस्त्र होतं. पोलिस अटक करण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांवर धावून जात त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर पोलिसांना चकवा देत त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी सिनेस्टाईल तीन ते चार किलोमीटरपर्यंत पाठलाग करुन त्याला पकडले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय वडिलांसोबत आंतरगाव येथे राहत होता.  ८ ऑगस्ट रोजी त्याचा वडिलांसोबत कोणत्यातरी कारणावरून वाद झाला होता. वाद इतका विकोपाला गेला की, त्याने आपल्या वडिलांची हत्या केली. 

शेजारच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार -

नवी मुंबईतील वाशी येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. शेजारच्या १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवाात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वाशी येथील कोपरी गावातील एका इमारतीत वास्तव्यास आहे. आरोपी देखील त्याच इमारतीत राहतो. काही दिवसांपूर्वी पीडिताच्या पोटात दुखू लागल्याने पालकांनी तिला दवाखान्यात नेले. मात्र, वैद्यकीय अहवालात पीडिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. याप्रकरणी पीडिताच्या पालकांनी तिच्याकडे विचारपूस केले असता तिने संपूर्ण प्रकार सांगितला.

विभाग