धनगर आरक्षणावरून राज्यातील वातावरण कमालीचं तापलं आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्यास विरोध करत नरहरी झिरवळ यांच्यासह आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून संरक्षण जाळीवर उड्या मारून आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात गोंधळ घातला आहे. मंत्रालयात लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर ३ आंदोलकांनी उड्या टाकल्यात. यावेळी धनगर आरक्षणासाठी तिघांनी जोरदार घोषणाबाजी करत जाळीवर उड्या मारल्या. पोलिसांनी तत्काळ धाव घेत तिघांना बाहेर काढलं आहे. या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ माजली आहे.
अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून धनगर समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आज मंत्रालयात जाऊन जोरदार आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
आदिवासी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले गेले. धनगर आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या आहेत. धनगर आंदोलकांनी जाळ्यावर उड्या मारल्यानंतर पोलिसांनी त्यांना बाहेर काढून ताब्यात घेतलं. त्यानंतर काही आंदोकांनी मंत्रालयाच्या आवारात घोषणाबाजी केली.
धनगरांना एसटी आरक्षण देण्यास विरोध करत मागील आठवड्यात आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरूनसंरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या होत्या. आरक्षणाच्या मुद्द्यासहित विविध मागण्यासाठीआदिवासी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या होत्या.
उड्या मारणाऱ्या आमदारांमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस -अजित पवार गटाचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, पालघरचे भाजप खासदार हेमंत सावरा, राष्ट्रवादी कॉंग्रेसच-अजित पवार गटाचे अकोलेचे आमदार किरण लहामटे, बहुजम विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील या आदिवासी समाजातील आमदारांचा समावेश होता.
आमदारांनी त्यानंतर आता धनगर समाजाच्या आंदोलकांनी मंत्रालयातील तिसऱ्या माळ्यावरून संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्याची घटना समोर आली आहे.