मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांना अखेर अटक

Pune Crime : धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांना अखेर अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 21, 2022 09:48 AM IST

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणा-या करुणा शर्मा यांच्याववर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज त्यांना अटक करण्यात आली आहे.

Dhanajay Munde-karuna Sharma
Dhanajay Munde-karuna Sharma

पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावर आरोप करणा-या करुणा शर्मा (karuna Sharma) यांच्यावर दोन दिवसांपूर्वी एका महिलेला मारहाण केल्याबद्दल तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर त्यांना आज येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली होती.

शर्मा यांनी एका महिलेला शिविगाळ तसेच हॉकी स्टिकने मारहाण करून पतीसोबत घटस्पोटासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या माहिलेने तीचे अपहरण केल्याचाही आरोप केला होता. या प्रकरणी तीने येरवडा पोलिसात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार अजयकुमार विष्णू देडे (वय ३२, रा.शिवाजीनगर, उस्मानाबाद), करुणा शर्मा (वय ४३, रा.सांताक्रुज, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तचा पती हे उस्मानाबादला राहत होते. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा यांच्याबरोबर झाली. त्या आपली ओळख करुणा मुंडे असे करुन दिली. फिर्यादीचा पती वारंवार करुणा शर्मा यांच्या घरी राहू लागला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा पती पुण्यात येऊन स्थायिक झाले. पती हा शर्मा यांच्याशी वारंवार बोलत होता. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी कार्यक्रमाला जायचे म्हणून पतीने तक्रारदार महिलेला भोसरी येथे नेले. येथे करुणा शर्मा यांनी हॉकीस्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ केली. फियार्दीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव करत आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग