Dhananjay Munde on Anjali Damania Allegations: धनंजय मुंडे राज्याचे कृषीमंत्री असताना १६१.६८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. दमानिया यांच्याआरोपाचं मी खंडन करतो. त्यांनी केलेले आरोप खोटेअसूनत्यांनी आत्मचिंतन करायला हवं. आजपर्यंत दमानिया यांनी केलेल्या आरोपांचे पुढे काय झाले ते त्यांनी पाहावे, असं मुंडे यांनी म्हटले आहे.
त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करण्यापलीकडे यात काही नाही. ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला ती संपूर्ण प्रक्रिया मार्च २०२४ मध्ये शासकीय नियम आणि धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आली आहे. मागील ५० दिवस त्या वेगवेगळ्या आरोप करतायेत. दुसऱ्याला बदनाम करणे, स्वत:ची प्रसिद्धी यासाठी केलेले हे आरोप आहेत असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, मागील ५० दिवसांपासून माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. पण त्यातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. स्वत:ची प्रसिद्धी आणि दुसऱ्याची बदनामी करण्या व्यतिरिक्त त्यात काही आढळत नाही. आज ५८ दिवस झाले माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु असून हे कोण करत आहे, मला माहिती नाही.
धनंजय मुंडे यांनी सांगितले की, डीबीटीत कोणत्या गोष्टी समाविष्ट करायच्या आणि वगळायच्या याचा अधिकार कृषीमंत्री वमुख्यमंत्र्यांनाअसतात. या निविदा प्रक्रियेतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मान्यतेने संपूर्ण प्रक्रिया राबवली गेली. अंजली दमानिया शेतकरी आहेत की नाही माहिती नाही. पेरणी आणि त्यानंतरच्या कार्यासाठी लागणाऱ्या बाबी मान्सूनपूर्व तयारी करून ठेवाव्या लागतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने जून महिन्यातील पेरणी हंगाम लक्षात घेता सदर प्रक्रिया मार्च महिन्यात राबवली गेली.शेतऱ्याला पेरणीच्या आधी कोणत्या गोष्टी लागतात,फवारणी कधी करायची, तण कधी काढायचे हे त्यांना माहिती नसावं,असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना १६१.६८ कोटी रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप दमानियांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी म्हटले की, कृषी मंत्र्याने केलेल्या घोटाळ्याचे मी पुरावे देणार आहे. डीबीटी योजना सरकारने काढली होती. या योजनेचे पैसे लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. १८४ लिटरची नॅनो युरियाची बॉटल ९२ रुपयांची आहे. पण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्यात तब्बल २२० रुपयांना ही बॉटल विकत घेतली गेली. कृषीमंत्री यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल्स या २२० दरानेघेतल्या. दुपट्टीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल्स विकत घेतल्या.
संबंधित बातम्या