Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांना लाडक्या बहिणींबद्दलचं ‘ते’ वक्तव्य भोवलं, निवडणूक आयोगानं दिला दणका
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांना लाडक्या बहिणींबद्दलचं ‘ते’ वक्तव्य भोवलं, निवडणूक आयोगानं दिला दणका

Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांना लाडक्या बहिणींबद्दलचं ‘ते’ वक्तव्य भोवलं, निवडणूक आयोगानं दिला दणका

Nov 10, 2024 11:56 PM IST

Dhananjay Mahadik : लाडकी बहीण योजनेबाबत अक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणात धनंजय महाडिक अडचणीत आले आहेत. आता निवडणूक आयोगानेही त्यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यांना नोटीस पाठवली आहे.

धनंजय महाडिकांना आयोगाची नोटीस
धनंजय महाडिकांना आयोगाची नोटीस

Dhananjay mahadik controversial statement : कोल्हापूरचे भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी प्रचार सभेत लाडकी बहीण योजनेवरून आक्षेपार्ह वक्तव्य केलं होते. या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून अक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी निवडणूक विभागाकडून धनंजय महाडिकांना नोटीस पाठवली आहे. धनंजय महाडिक यांनी भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ करवीर येथे आयोजित जाहीर सभेमध्ये लाडक्या बहिणींना धमकी दिली होती.

लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत किंवा सभेत दिसल्या तर त्यांनी नावे घ्या, त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या. आम्ही त्यांची व्यवस्था करतो.,असे वादग्रस्त वक्तव्य महाडिक यांनी केले होते. या वक्तव्याप्रकरणी आता त्यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे.

दरम्यान धनंजय महाडिक यांचा खुलासा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अमान्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातीलफुलेवाडी येथील पाचवा स्टॉप येथे कोल्हापूर दक्षिणचे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभाआयोजित केली होती. या सभेत धनंजय महाडिक यांनीआपल्या भाषणात लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य करूनभारतीय न्यायसंहिता - २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.

भाषणात केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर धनंजय महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त करत महिलांची माफी मागितली, तरीही धनंजय महाडिक यांना निवडणूक विभागाने नोटीस पाठवली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्याचा खुलासा करा,असे आदेश निवडणूक विभागाने दिले आहेत.

महाडिकांनी मागितली महिलांची माफी -

आपल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाल्यावर महाडिकांनी माफी मागितली आहे, सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल, तर त्यांची माफी मागतो. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना, विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना, लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना,चुकून आलेली प्रतिक्रिया आहे.

मी माझ्या वैयक्तिक, राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नी मार्फत गेली १६ वर्षे भागीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमीच सकारात्मक काम करत आलो आहे आणि या पुढे देखील करत राहीन. महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण बाबत, आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. तरीही माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अंबाबाईच्या चरणी मी प्रार्थना करतो, असे निवेदन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले आहे.

Whats_app_banner